मी मिलिंद शंभरकर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सोलापूर जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद्द वगळून) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना (कोव्हीड- १९) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटणेसाठी दिनांक ०७.०६.२०२१ चे सकाळी ७.०० वा. पासून पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे.