सोलापूर : सोलापुरातील भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे पक्षातील ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते अशोक निम्बर्गी यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शनिवारी निम्बर्गी यांची भाजप नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. अखेर रविवारी काँगेस पक्षाच्या महाशिबिरात ते सुरुवातीलाच स्टेजवर पहिल्या रांगेत दिसून आले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, भाई जगताप, आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत निंबर्गी यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला.
यानंतर बोलताना निंबर्गी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पार्टीमध्ये होत असलेली घुसमट त्यांनी बोलून दाखवली, किती वर्ष सहन करायचं? असा प्रश्न उपस्थित करीत देशमुखीवर त्यांची तोफ कडाडली पहा ते काय म्हणाले….

















