सोलापूर जिल्ह्यात 335 गावांमध्ये सोमवारी इयत्ता आठवी ते बारावी च्या शाळा सुरू झाल्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
सोलापूर जिल्ह्यातील जी गाव कोरोनामुक्त आहेत,अशा सुमारे 700 गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाकडे पाठवला होता, यावर राज्य शासनानेही विचार करून पुरणाचे सर्व नियम आणि सुरक्षा पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यापैकी मागील एक महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील 335 गावे ही कोरोनामुक्त आहेत अशा गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी दरम्यानच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला. सोमवार 12 जुलै रोजी राज्यातील शाळेची पहिली घंटा सोलापूर जिल्ह्यात वाजली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील एस व्ही सी एस प्रशाला तसेच जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वतः स्वामी यांनी स्वागत केले, स्वतः सीईओ यांनी विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला तसेच जिल्हा परिषदेची शाळा झाडाखाली सुरू होती त्या ठिकाणी जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सर्व पालकांनी आमच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, प्रायोगिक तत्वावर काही शाळा सुरू केल्या 15 जुलै पासून 335 गावातील शाळा सुरू होतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली




















