सोलापूर शहरात डेंग्यू सदृश आजाराचे वाढते प्रमाण, त्यामुळे काही लहान मुलांचे मृत्यू झाले आहेत, महापालिका प्रशासन याविषयी गंभीर नाही, महापालिका आयुक्त पी शिवशंकर हे शहराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत, महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नाही, याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले, महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या भोंगळ कारभारा वर काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी डेंगूची प्रतिकात्मक फवारणी करत आंदोलन केले या आंदोलनात प्रदेशचे युवक सरचिटणीस तथा नगरसेवक विनोद भोसले शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पहा आंदोलनाचे व्हिडिओ


















