सोलापुरात मराठा समाज आणि शिवभक्त यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त लिखान करणाऱ्या गिरीश कुबेरच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त लिखाण करणार्या लेखक गिरीश कुबेर यांचा सोलापुरात पुतळा दहन करण्यात आला. आपल्या पुस्तकात लेखक गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेले वादग्रस्त लिखाण मागे घेण्यात यावे या मागणीसाठी सोलापुरात आंदोलन करण्यात आले आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कुबेरांचा पुतळा जाळत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
– वादग्रस्त लिखाण करणाऱ्या गिरीष कुबेर यास सोलापुरात पाय न ठेवू देण्याचा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे आणि सुनिल रसाळे यांनी दिला.
:- तसेच पुण्यात येवून कुबेरांना काळे फसण्याचा इशारा देखील यावेळी मराठा महासंघाचे राष्टीय उपाध्यक्ष दास शेळके यांनी दिला.- यावेळी शिवभक्त अक्षय बचुटे नवनाथ भजनावळे बाबा शेख यांच्यासह युवक उपस्थित होते.


















