सोलापूर ! रविवार ४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास सात रस्ता सोलापूर येथे कर्नाटक एस टी क्रमांक KA 29 फ 1155 या तेरदल येथून निघालेल्या विजापूर हुन सोलापूर कडे आलेल्या एस टी वाहनावर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केली आहे.एस टी बसचे समोरील काच फोडून नुकसान केले आहे.
दगडफेक कोणत्या कारणामुळे झाली अद्याप स्पष्ट असून घटनास्थळी सदर बझार पोलीस दाखल झाले आहे.दगडफेक केलेल्या इसमाचा शोध पोलीस करत आहे. सोलापूर शहरात मराठा समाजाचा आरक्षण आक्रोश मोर्चा अतिशय शांतपणे निघाला, पोलीस प्रशासनाने अडवणूक करून ही कुठे ही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान काही समाजकंटक दगडफेक करून फरार झाले त्या इसमांचा शोध सुरू आहे.



















