सोलापूर भुसार आडत व्यापारी संघाच्या कार्यकारिणीची मंडळाची ऑनलाइन सभा संघाचे अध्यक्ष प्रभाकर विभुते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संपन्न झाली .
सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून व्यापाऱ्यांवर वेळोवेळी होत असलेली कारवाई याची चर्चा या बैठकीत झाली. एकीकडे अशा परिस्थिती व्यापारी वर्ग सेवा देत असताना त्यांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण झाला आहे तसेच प्रशासनाकडून होत असलेली कारवाई, मिळत नसलेले सहकार्य, अरेरावीला कंटाळून सोमवार दिनांक 24 मे ते 31 मे पर्यंत मार्केट यार्डातील भुसार विभाग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तरी सर्व व्यापारी बंधवांनी आपल्याकडे येणाऱ्या मालाचे लोडिंग व अनलोडिंगची व्यवस्था रविवार दिनांक २३ मे पर्यंत करून घ्यावे दिनांक २४ मे पासुन दिनांक ३१ मे आठ दिवस संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहे याची सर्व व्यापारी बंधूंनी नोंद घ्यावी. असे आवाहन अध्यक्ष प्रभाकर विभुते, उपाध्यक्ष सुरेश चिक्कळी, सेक्रेटरी मोहन कोंकाटी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे यांनी केले आहे.


















