पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ६७ पोलीस शिपाई पदासाठी भरती करीता सन २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यांची लेखी परीक्षा दिनांक ०७/१०/२०२१ रोजी दुपारी १२.०० वा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र (HALL TICKET) दिनांक ०२/१०/२०२१ रोजी पासून सायंकाळी ०६.०० वाजेपासून त्यांचे ई मेल आय. डी. व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सदरचे प्रवेशपत्र https://mahapolicere.mahaitexam.in या पोर्टलवरून देखील डाऊनलोड करता येतील. उमेदवार परीक्षेकरीता ओळखपत्रावर नमूद असलेल्या परीक्षाकेंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे.
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...


















