सोलापूर : संघटित गुन्हेगारी करून सोलापूर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या पाच अट्टल आरोपींवर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशानुसार मोक्का लावण्यात आला असून या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फौजदार चावडी पो.स्टे. गुन्हा रजि. नंबर ७९८/२०२१ भादवि ३९९, ४०२ सह आर्मअॅक्ट ४(२५) प्रमाणे हा दिनांक २४/११/२०२१ रोजी दाखल आहे. आरोपी नामे (१) संतोष संजय कांबळे, वय २९ वर्षे, रा. जय मल्हार चोक, भागवती मंदिराचे पाठीमागे आडवा नळ, सोलापूर (२) चंद्रकांत विठ्ठल दिक्षीत, वय-२५ वर्षे, रा. शिवगंगा नगर, भाग-५ कुमठा नाका, सोलापूर (३) सतिश अनिल गायकवाड वय २४ वर्षे, रा. शिवगंगा नगर, भाग-५ कुमठा नाका, सोलापूर (४) अकाश महादेव माडगे, वय-२२ वर्षे, प्लॉट नं. २६ कलप्पा म्हेत्रे वस्ती, कुमठा नाका, सोलापूर (५) अक्षय दिगंबर उर्फ आब्बाराव शिंदे, वय २६ रा. जय मल्हार चौक, भागवती मंदिराच्या पाठीमागे, सोलापूर यांना दिनांक २४/१२/२०२१ रोजी पोसई देशमाने, फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी अटक केली आहे.
दिनांक २४/११/२०२१ रोजीचे रात्रीचे वेळी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी संतोष संजय कांबळे हा त्याचे •साथीदारांसह जुना पुनानाका येथील युनियन बँकेचे ए.टी.एम. फोडण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेने फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील रात्रगस्तीचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बरडे, पोका १४५६ बहुरे, पोका/ ९६०४ व्हटकर, पोको/८८७ ओंचासे, पोकों/१९९ साठे, पोकों/९२६ कांबळे, पोकों/१५५२ माने यांनी जुना पुनानाका याठिकाणी नाकाबंदी लावून पहाटे ०४.१० वा.चे सुमारास मुख्य आरोपी संतोष कांबळे व त्याचे वरील चार साथीदारांना तवेरा गाडी क्रमांक एम.एच.२४.व्ही.०६४४ सह जुना पुना नाक्या पासून थोडया अंतरावर लोकमंगल बँकेचे समोर ताब्यात घेतले. सदर आरोपींची तवेरा गाडीची तपासणी केली असता त्यांना गाडीमध्ये लोखंडी हातोडा, लोखंडी छन्नी, कोयता, चाकू, लोखंडी टॉमी, लाल मिरची पावडर, नकली बेनटेक्सचे दागिने व रोख रक्कम मिळून आली असून सदर आरोपींकडून एकूण ५,७८,२५९/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी क्रमांक १ (टोळी) संतोष संजय कांबळे, वय २९ रा. जय मल्हार चौक भागवती १ मंदिराचे पाठीमागे आडवा नळ सोलापूर हा त्याचे नेतृत्वाखाली संघटनेत सद्या सक्रिय असलेले सदस्यांचे व्यतिरिक्त वेळोवेळी इतर सदस्यांना बरोबर घेवून संघटीत गुन्हेगारी संघटनेचे माध्यमातून स्वतःसह त्याचे नेतृत्वाखाली संघटीत गुन्हेगारी संघटनेतील प्रत्येक सदस्यांसाठी आर्थिक लाभ संपादित करण्यासाठी संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख व इतर सदस्य संयुक्तपणे गंभिर हिंसाचार करुन जुलूम जबरदस्ती करून दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी चोरी, सरकारी नौकरावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून जबरीची चोरी करणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, अशा प्रकारचे मालाविरुध्दचे व शरिराविरुध्दचे गंभिर स्वरुपाचे गुन्हे करत असलेने व मागिल दहा वर्षात त्यांनी अशा पध्दतीचे गुन्हे केले असलेने यातील आरोपी क्रमांक १ व त्याचे गुन्हयातील इतर साथीदार यांचे विरुध्द वरील दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) प्रमाणे वाढीव कलम अंतभूत करण्याची परवानगी मिळणे करिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फोजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी जा.क्र. ८८२६/२०२१ दिनांक २७/१२/२०२१ प्रमाणे मा.पोलीस आयुक्तसो, सोलापूर शहर यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याप्रमाणे मा.पोलीस आयुक्तसो, सोलापूर शहर यांनी दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii), ३(२), ३(४) प्रमाणे कारवाई करणेस मंजूरी दिलेली आहे.
त्याप्रमाणे दिनांक ०१/०१/२०२२ रोजी वरिल नमूद गुन्हा रजि. नंबर ७९८/२०२१ भादवि ३९९,४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२). ३(४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने यातील आरोपींना दिनांक ०६/०१/२०२२ रोजी मा. विशेष न्यायाधिश, मोक्का न्यायालय सोलापूर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक १३/०१/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी (टोळी प्रमुख) संतोष संजय कांबळे व त्याचे गुन्हयातील इतर साथीदारां विरुद्ध पोलीस आयुक्तालय सोलापूर अंतर्गत फौजदार चावडी, जेलरोड, जोडभावीपेठ, एमआयडीसी व सदर बझार पोलीस ठाणेस मालाविषयी व शरिराविषयी एकूण २७ गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपआयुक्त (परीमंडळ) डॉ.संतोष गायकवाड सहायक पोलीस आयुक्त, विभाग १ सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, राजेंद्र बहिरट वरीष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. देशमाने, पोहेकॉ/ ५६९ उबाळे, पोहेकों/१२५ गायकवाड, पोना/ ६०० वाघमारे यांनी केली आहे.


















