पाली येथून नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली होती. त्यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पण रात्री पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज काढू अशी भाषा वापरली आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका महागात पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल कानाखाली आवाज काढण्याची भाषा वापरली म्हणून नारायण राणे यांच्या विरोधात महाड आणि नाशिक या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दरम्यान सोलापूर शहरात शिवसेनेच्यावतीने प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर विजय पुकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी नवी पेठमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध नोंदविण्यात आला. राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली


















