सोलापूर : पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी मंगळवारी पोलिस आयुक्तालयातील तब्बल 13 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत यामध्ये फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना जेलरोड पोलीस ठाणे देण्यात आले आहे, नियंत्रण कक्षात असलेले पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्याकडे फौजदार चावडी पोलीस ठाणे देण्यात आले आहे. विजयलक्ष्मी कुर्री, बाळासाहेब भालचिम, शिवाजी राऊत, राजेंद्र करणकोट, चंद्रकांत वाबळे, संजय पवार, विश्वनाथ सिद्ध, सय्यद या पोलीस निरीक्षकांची या बदली ऑर्डर मध्ये नावे आहेत.


















