सोलापूर जिल्हा प्रशासन, पोलिस, प्रशासन, म.न.पा प्रशासन, वाहतुक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाखा, NHAI,PWD आदी आधिकारी वर्गासमवेत अपघात आणि जडवाहतूकी संदर्भात दुसरी महत्वाची बैठक पोलिस आयुक्तालय येथे पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी बोलावली होती. यामध्ये खालील निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
१. सकाळी ७.०० ते रात्री.२१.०० वा.पर्यंत सोलापुर शहरातील संपुर्ण जड वाहतुक बंद
२. रात्री.२१.०० वा. ते सकाळी ७.०० वा. पर्यंत जड वाहतुकीस परवानगी.
३.जुना पुना नाका ते निराळे वस्ती येथून जड वाहतुक कायम स्वरूपी बंद. सदर ठिकाणी मनपा आणि पोलिस प्रशासन आणि वाहतुक प्रशासनांतर्गत हाईट ब्रेकर बसवण्यात येणार.
४. सकाळी.६.०० ते रात्री.२२.०० पर्यंत जुना पुना नाका ते छ.शिवाजी महाराज चौक व्हाया आण्णाभाऊ साठे चौक येथील जड वाहतुक बंद.
५.सोलापुर शहरातील माल उतरविण्यासाठी येणाऱ्या माल वाहतुकीस शिथिल असलेली दुपारी १.०० ते सायं.४.०० पर्यंतची अट रद्द.
६. शहरामध्ये जड वाहतुकीमुळे होणारे अपघात टाळणेसाठी जड वाहतुकीस २० किमी प्रति तास वेग मर्यादा.
७. अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या वाहनास परवानगी.
८. शहरातील १९ सिग्नल पैकी ७ चालू सिग्नल व्यतिरिक्त बंद असलेले सिग्नल चालू करण्याचे आदेश.
९.ऊस वाहतुक ट्रॅक्टर साठी १.ट्रॉली चा निर्बंध.
१०. वरील सर्व निर्बंध दि.१ फेब्रु २०२३ पासुन लागू करण्याचे आदेश.
यावेळी राज सलगर(सोलापुर युवक प्रतिष्ठान), आतिश बनसोडे(दलित पँथर प्रणित युवा पँथर), सोहन लोंढे(डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), सुहास कदम(राष्ट्रवादी कॉन्ग्रेस), जुबेर बागवान(राष्ट्रवादी कॉन्ग्रेस), शाम कदम(संभाजी ब्रिगेड), सोमनाथ राऊत(संभाजी ब्रिगेड), शोएब चौधरी(AIMIM), शरद गुमटे (कॉन्ग्रेस), अक्षय अंजिखाने(भाजपा), सुरज पाटील(सामाजिक कार्यकर्ते), बाबा निशाणदार(सामाजिक कार्यकर्ते), अरविंद शेळके, तेजस गायकवाड यासह अनेक सोलापुर विकास संघर्ष समितीचे निमंत्रक उपस्थित होते.