सोलापूर : सोलापूरच्या राजकीय वर्तुळात कायम चर्चेचा विषय असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी दिले आहेत. येत्या 45 दिवसात कारखाना प्रशासनाने चिमणी पाडावी अन्यथा महापालिका प्रशासन कारवाई करेल असा इशाराही आयुक्त यांनी दिलेल्या नोटीस मध्ये दिला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते की, आता कारखान्याच्या वेळेत हंगाम संपलेला आहे त्यामुळे महापालिकांनी आपली कारवाई करावी.
त्यानुसार आता हा विषय पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी आपला न्यायालयीन लढा सुरू ठेवत वारंवार या चिमणीला वाचवण्याचे पाहायला मिळाले. आता महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्याने काडादी यांची भूमिका काय असेल हे पाहणे हे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
सोलापूर होटगी रोड विमानतळावरून विमान सेवा सुरू होण्यास केवळ सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा असल्याचे सर्व्हेमधून पुढे आले आहे. त्यामुळे ही चिमणी पाडावी यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने अनेक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. विकास मंचचे प्रमुख केतन शहा यांची भुमिका काय हे सुध्दा जाणणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे .


















