सोलापूर : सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वाना आपल्या निवासस्थानी बैठकीला बोलावले होते, या बैठकीला सर्वच नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी आपल्या भाषणात अध्यक्ष काडादी यांनी सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी बद्दल बोलताना आपल्यातीलच काही असंतुष्ट मंडळी अधिकाऱ्यांच्या अडून त्रास देत आहेत मात्र प्रदूषण मंडळाने दिलेले क्लोजर नोटीसच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिला असून ती नोटीस बाजूला ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली….पहा काय म्हणाले काडादी

















