शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचे नगरसेवक पद उच्च न्यायालयात रद्द ठरवण्यात आले आहे. 2017 साली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेच्या उमेदवार अनिता मगर या विजयी झाल्या होत्या .त्यांनी भाजपच्या भाग्यलक्ष्मी म्हंता यांना पराभूत केले होते त्यानंतर भाजपच्या पराभूत उमेदवार म्हंता यांनी सोलापूर न्यायालयात नगरसेविका अनिता मगर यांना तीन अपत्ये आहेत व तिसरे आपत्ये हे 12 सप्टेंबर 2001 रोजी जन्मलेले असल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 10 प्रमाणे अपात्र आहेत व त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे अशा आशयाची याचिका दाखल केली होती,
सुनावणीअंती सोलापूर कोर्टाने 2018 साली नगरसेविका अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्द ठरविले होते या आदेशाविरुद्ध मगर यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती, सदर प्रकरणात 14 ऑक्टोबर 2020 रोजी अंतरिम सुनावणी घेण्यात आली व निकाल राखून ठेवण्यात आला होता त्याचा निकाल 24 मे 2021 रोजी देण्यात आला या निकालात नगरसेविका अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले.
उच्च न्यायालयाने सोलापूर कोर्टाचा निकाल कायम ठेवला अनिता मगर यांच्या वकिलांच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची स्थगिती मिळाली आहे या प्रकरणात भाग्यलक्ष्मी म्हंता यांच्याकडून एडवोकेट अजित आळंगे यांनी काम पाहिले,अनिता मगर यांच्यावतीने विश्वासराव देवकर महापालिकेच्यावतीने एडवोकेट विश्वनाथ पाटील तसेच सोलापूर न्यायालयात म्हणता यांच्याकडून ॲडव्होकेट निलेश ठोकडे यांनी काम पाहिले.

















