सोलापूर ! सात रस्ता परिसरातील उत्तर सदर बजार या भागात राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या वडिलांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात याप्रकरणी संशयित तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे मागील दहा दिवसात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची ही दुसरी घटना आहे विशेष म्हणजे यातील अल्पवयीन मुली या दहावी मध्ये शिकत होत्या.
यातील फिर्यादी हे उत्तर सदर बाजार परिसरात राहतात , त्यांची दहावीत शिकणारी सोळा वर्षाची मुलगी ही रंगभवन परिसरातील एका शाळे मध्ये शिकत होती. दिनांक 22 जुलै 2021 रोजी ऑनलाइन क्लास असल्याने काहीवेळासाठी ती शाळेमध्ये वही तपासणीसाठी गेली होती तिच्या वडिलांनी तिला शाळेत सोडले नंतर आणायला गेल्यावर तिच्या मैत्रिणी आणि त्या मुलीने आम्ही काही वेळाने घरी येतो असे सांगितले.
मात्र बराच वेळ झाला तरी ही मुलगी आली नाही म्हणून वडील शाळेत चौकशी करायला गेले असता ती न सांगता निघून गेल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान मैत्रिणींकडे अधिक चौकशी केली असता शाळेतील एका मुलासोबत ती मुलगी गेल्याचे समजले, मुलाच्या घरी चौकशी केली असता मुलगा तिथे हि नव्हता त्यामुळे मुलीच्या वडिलांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात शाळेतील त्या संशयित मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



















