सोलापूर : ‘लोक माझे सांगती’ या पुस्तक प्रकाशनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आता आपण अध्यक्ष पदावरून पाय उतार होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संपूर्ण देशात याचे पडसाद उमटले. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी सर्व नेते कार्यकर्त्यांनी मागणी केली. काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केली, काही कार्यकर्त्यांनी तर आपल्या रक्ताने पत्र पाठवले.
दरम्यान शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत सुद्धा पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही अशा ठराव केला होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतः शरद पवार यांनी आपण सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेत आहोत अशी घोषणा केली यावेळी पवार काय म्हणाले पहा….


















