मुंबई, 3 जून: राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरू होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांत काही निर्बंध लागू असणार आहेत. उद्यापासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.
आठवड्याला आढावा घेऊन निर्णय
दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघून जिल्ह्यांचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहितीही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
कुठल्या जिल्ह्यात किती टप्प्यांचा समावेश?
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे – सर्व 18 जिल्हे अनलॉकचा निर्णय
दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे
तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश
असे आहेत 5 टप्पे
पहिला टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आत आहे तिथ लांकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही.
पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.
जिम, सलून सुरू राहणार
बस 100 टक्के क्षमतेने
आंतरजिल्हा प्रवास मुभा राहणार
लोकल ट्रेनचा काय निर्णय?
मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल.
अनलॉक झालेले राज्यातील 18 जिल्हे
भंडारा बुलढाणा, चंदपूर,धुळे, गडचिरौली
गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड
नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ
दुसरा टप्पा –
दुसऱ्या टप्प्यात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील या जिल्ह्यांत काही निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
तिसरा टप्पा –
तिसऱ्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. सोलापूर, रत्नागिरी, बीड, अकोला, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे

















