सोलापूर : महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी दुपारी आदेश काढून सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची नियमावली जाहीर केली. मागील अनेक दिवसांपासून यात्रा कशा पद्धतीने होणार याची उत्सुकता होती मात्र आता ही यात्रा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटी प्रमाणे होणार आहे पहा नेमकी नियमावली काय आहे ती…
१) यात्रेचा पहिला दिवस: १२ जानेवारी २०२२
दिनांक १२/०१/२०२२ रोजी यन्नी मज्जन हा धार्मिक विधी असतो त्यामध्ये सकाळी ८.०० वाजता उत्तर कसबा येथिल श्री मल्लिकार्जुन देवळाजवळ श्री. हिरेहब्बू यांच्या निवास स्थानापासून काठयांची (नंदीध्वज) मिरवणूक निघते व त्याच दिवशी पुन्हा दुपारी १.०० वाजता श्री सिध्देश्वर मंदिरातून मिरवणूक निघून ६८ लिंगास योगदंडासह तैलाभिषेक करुन पुजा केली जाते. या काळात मिरवणूकीमध्ये मानकरी, नंदीध्वजधारक व भाविक मोठया प्रमाणात येतील त्यामुळे ओमिक्रॉन व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याचा विचार करता यन्ती मज्जन या धार्मिक मिरवणूकीस परवानगी देण्यात येणार नाही.
तथापी विधीवत धार्मिक कार्यक्रम करणेच्या अनुषंगाने दिनांक ११/०१/२०२२ रोजी मानाचे ७ नंदीध्वज अगोदरच मंदिर परिसरात ठेवून तेथेच सजविण्यात यावे. नंदीध्वज सजविणेचा कार्यक्रम श्री सिध्देरामेश्वर देवस्थान मंदिर परिसरामध्ये पुजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत करणेत येवून त्याची विधीवत पुजा इत्यादी कार्यक्रम करतील.
प्रत्येक नंदीध्वजा समवेत ०५ व्यक्ती (एकूण ३५ व्यक्तो) तसेच त्यांचे सोबत इतर १५ पुजारी व मानकरी अम मिळून एकूण ५०० व्यक्ती यांना परवानगी देणेत येत आहे. व त्याबाबतची यादी देवस्थान समितीने किमान ०२ दिवस आधी पोलीस विभाग यांना सादर करावी.
तसेच दिनांक १२/०१/२०२२ रोजी विविध कार्यक्रमांसाठी नंदीध्वनाची विधिवत पूजा करणेसाठी संपूर्ण कार्यक्रमात श्री सिध्देश्वर मंदिर परिसरात यात्रा काळात मानाचे ७ नंदीश्वन श्री सिध्देश्वर देवस्थानात निश्चित केलेल्या ठिकाणी ठेवणेत यावेत यन्नीमज्जन या विधीसाठी ६८ लिगाम योगदंडासह तैलाभिषेक करणेकामी
योगदंडाधारक व ७ नंदीध्वजाचे प्रत्येकी १ मानकरी यांना वाहनातून परवानगी देणेत येईल.
उपरोक्त विधिवत पुजा करताना संबंधितानी मास्कचा वापर करणे, Social Distancing ये पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहिल.
• सिध्देश्वर यात्रा कालावधीत शासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत वेळोवेळी पारित केलेल्या निर्देशाचे पालन करणे सर्व सहभागी नागरिक, पुजारी तसेच मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचेवर बंधनकारक राहील.
२) यात्रेचा दुसरा दिवस: १३ जानेवारी २०२२
१३/०१/२०२२ रोजी मंदिर परिसरातील कट्टा येथील अक्षता सोहळ्याच्या धार्मिक विधी असतो. त्यासाठी मानकरी व ७ नंदीध्वजासह परवानगी असलेले नंदीध्वजधारक यांचेसह संमती कट्टा येथे श्री सिध्दरामेश्वर देवस्थान येथून संमती कट्ट्यापर्यंत धार्मिक कार्यक्रमापुरते परवानगी देणेत येत आहे. अक्षता सोहळा संपल्यानंतर ६८ लिंग प्रदक्षिणाकरीता नंदीध्वज मिरवणूकीस परवानगी देणेत येणार नाही. अक्षता सोहळा कार्यक्रमासाठी मंदिर समितीकडून लसीकरणाचे २ डोस पूर्ण झालेल्या व ४८ तासाच्या आतोल RT PCR बाचणो निगेटिव्ह असलेल्या मानकऱ्यांसाठी पासेसची मागणी करणत यावा. प्रत्येक नंदीध्वजासमवेत ५ व्यक्तो (एकूण ३५ व्यक्ती) तसंच त्यांचेसोबत इतर १५ पुजारी व मानकरी असे एकूण मिळून ५० व्यक्ती यांना परवानगी देणेत येत आहे व त्याबाबतची यादी देवस्थान समितीने किमान ०२ दिवस आधी पोलीस विभाग यांना सादर करावी. संमती कट्टा येथील कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नंदीध्वज हे श्री सिध्देश्वर मंदिर या ठिकाणी निश्चित केलेल्या ठिकाणी स्थानापन्न होतील. पोलीस आयुक्तालयाकडून सदर ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवणेत यावा. तसेच शहरामध्ये वाहतूक व गढ़ींवर नियंत्रण ठेवणेसाठी आवश्यक ती उपाययोजना पोलीस आयुक्त सोलापूर शहर हे वेळोवेळी आवश्यक ते आदेश निर्गमित करतील.
उपरोक्त विधीवत पूजा करताना संबंधातांनो सास्कचा वापर करणे Social Distancing चे पालन करणे. हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे संनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
सिध्देश्वर यात्रा कालावधीत शासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत बळावळी पारित कलल्या निर्देशाचे पालन करणे सर्व सहभागी नागरिक, पूजारी तसेच मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचवर बंधनकारक राहील
३) यात्रेचा तिसरा दिवस: १४ जानेवारी २०२२
दिनांक १४/०१/२०२२ रोजी नंदीध्वजासह तिळ व हळदीचे उटणेचे लेपन करुन मंदिर परिसरातील तलावामध्ये गंगास्नान घालण्याचा धार्मिक कार्यक्रम असतो. या कार्यक्रमासाठी योगदंडाचे मानकरी यांना नंदीध्वज विरहित विधी करण्यास परवानगी असेल. तसेच त्यांचे सोबत वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या एकूण ५० व्यक्ती यांना परवानगी देवून मंदिर परिसरातच प्रस्तुत विधी करणेस परवानगी देणेत येत आहे व त्याबाबतची यादी देवस्थान समितीने ०२ दिवस आधी पोलीस विभाग यांना सादर करावी.
दिनांक १२/०१/२०२२ ते दिनांक १६/०१/२०२२ या कालावधीमध्ये नंदीध्वज हे श्री सिध्देश्वर मंदिर येथे स्थिर राहतील. केवळ मंदिर परिसराच्या भागामध्ये हलविणेस परवानगी राहील. दिनांक १४/०१/२०२२ रोजी सायंकाळी पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधून व इतर नंदीध्वजास बाशिंग व सजावट करता येईल. त्यानंतर नंदीध्वजाच्या मिरवणूकीस परवानगी देणेत येणार नाही. होम मैदान येथे होम प्रदिपन कार्यक्रमासाठी नंदीध्वज विरहीत योगदंडासह श्री सिध्देश्वर मंदिर पासून फडकुले सभागृहाच्या बाजूच्या रस्त्याने नॉर्थकोटकडे असलेल्या मार्गाकडून होम मैदानावर प्रवेश करतील. तेथून होम मैदानावर होम कुंडाजवळ निश्चित केलेल्या योगदंडधारक व मानकरी यांचेसह औपचारिकता म्हणून सदर विधीस उपस्थित राहणेस परवानगी देणेत येत आहे. योगदंडसमवेत एकूण ३५ व्यक्ती तसेच त्यांचे सोबत इतर १५ पुजारी व मानकरी असे मिळून एकूण ५० व्यक्ती यांना परवानगी देणेत येत आहे. सदर ठिकाणी परवानगी व्यतिरीक्त इतर भाविक येणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत श्री सिध्देश्वर मंदिर पंच कमिटी नियोजन करतील. होम हवन विधी कार्यक्रम संपल्यानंतर योगदंड हे श्री सिध्देश्वर मंदिर या ठिकाणी निश्चित केलेल्या ठिकाणी स्थानापन्न होतील. पोलीस आयुक्तालयाकडून सदर ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवणेत येईल. तसेच शहरामध्ये वाहतूक व गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी आवश्यक ती उपाययोजना पोलीस आयुक्त सोलापूर शहर हे वेळोवेळी आवश्यक ते आदेश निर्गमित करतील.
उपरोक्त विधीवत पुजा करताना संबंधीतांनी मास्कचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग चे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
सिध्देश्वर यात्रा कालावधीत शासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत वेळोवेळी पारित केलेल्या निर्देशाचे पालन करणे सर्व सहभागी नागरिक पुजारी तसेच मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचेवर बंधनकारक राहील.
४) यात्रेचा चौथा दिवस: १५ जानेवारी २०२२
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी होम मैदान येथील दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या शोभेच्या दारु कामासाठी परवानगी देणेत येणार नाही.
५) यात्रेचा पाचवा दिवस: १६ जानेवारी २०२२
दिनांक १६/०१/२०२२ रोजीचे कप्पडकळी कार्यक्रम मिरवणूकीस परवानगी देणेत येणार नाही..
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव विचारात घेता नंदीध्वजाची नगर प्रदिक्षणा मिरवणूक न काढता प्रतिकात्मक स्वरुपात श्री सिध्दरामेश्वर योगदंड घेऊन मंदिर परिसरात पार पाडतील. सदर नंदीध्वजासमवेत ०५ व्यक्ती (एकूण
३५ व्यक्ती) तसेच त्यांचे सोबत इतर १५ पुजारी व मानकरी असे मिळून एकूण ५० व्यक्ती यांना परवानगी देणेत येत आहे. व त्याबाबतची यादी देवस्थान समितीने किमान ०२ दिवस आधी पोलीस विभाग यांना सादर करावी. संपूर्ण यात्रा कालावधीत दिनांक १२/०१/२०२२ ते दिनांक १६/०१/२०२२ या कालावधीत सर्व नंदीध्वज हे श्री सिध्देश्वर मंदिर परिसरातच निश्चित केलेल्या ठिकाणी स्थानापन्न होतील.
उपरोक्त विधीवत पूजा करताना संबंधीतांनी मास्कचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग चे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
सिध्देश्वर यात्रा कालावधीत शासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत वेळोवेळी पारित केलेल्या निर्देशाचे पालन करणे सर्व सहभागी नागरिक, पुजारी तसेच मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचेवर बंधनकारक राहील.
६) भाविकांचे मंदिर प्रवेशाबाबत
दिनांक १२/०१/२०२२ ते दिनांक १६/०१/२०२२ या कालावधीत दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांकरीता ऑनलाईन (Online) दर्शन पासची सुविधा मंदिर समिती उपलब्ध करुन देईल. तसेच दर्शनाकरीता सकाळी ८.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत एकावेळी फक्त ५० भाविकच मंदिर परिसरात असतील याची दक्षता मंदिर समिती घेईल. दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांचे लसीचे २ डोस झालेले असावेत.
यात्रा कालवधीत श्री सिध्देश्वर मंदिर भाविकांना केवळ मुखदर्शनासाठी खुले राहिल. तथापी देवस्थान कडून
परपरेनुसार चालत राहिलेल्या सर्व नित्योपचार देवस्थान मार्फत करण्यात यावेत. मंदिरात भाविकांची गर्दी होणार नाही.
याकरीता देवस्थान समिती सोलापूर यांचेमार्फत खाजगी सुरक्षारक्षक नेमणेत यावेत. याबाबतच्या माहितीसह
सुरक्षारक्षकांची यादी मंदिर समितीने पोलिस व महानगरपालिका प्रशासनास दयावी
७) इतर उपाययोजना
१. सन २०२२ च्या श्री सिध्दरामेश्वर यात्रेस दैनंदिन स्वरुपात हजारो भाविक उपस्थित राहून यात्रेत जमलेल्या जनसमुदायांच्या माध्यमातून कोविड १९ विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासन आदेश दिनांक २७/११/२०२९ अन्वये ठरवून दिलेल्या मानक प्रणाली (Standard Operating Procedure SOP) चे अनुपालन होते अगर कसे याबाबतची सुनिश्चिती करण्यासाठी यात्रेच्या परिसरात आवश्यक ती पोलीस यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याची तजवीज करणेकामी योग्य ते आदेश पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी करावे. तसेच स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करावी.
२. राज्यातील कोविड- १९ व ओमिक्रॉनची पार्श्वभूमी व जगभरात आढळून आलेले नवे स्वरुप व संसर्ग याबाबी विचारात घेऊन सामाजिक उत्तदायित्वाचे भान ठेवून यात्रा प्रतिकात्मक, मर्यादीत व साध्या पध्दतीने साजरा करणेबाबत व यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित होईल अशा कार्यक्रमांवर बंदी असेल याची सर्व खबरदारी देवस्थान समितीने घ्यावयाची आहे. यात्रेदरम्यान श्री सिध्दरामेश्वर देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रम, नंदीध्वजाची पूजा, मिरवणूक, आरती, महापूजा, यांचे थेट प्रक्षेपण फेसबूक लाईव्ह, यु-ट्युब, तसेच मोबाईल अॅप या समाजमाध्यमांद्वारे करण्यात यावे. तसेच जास्तीत जास्त भाविकांनी समाजमाध्यमाद्वारे यात्रेतील कार्यक्रम पाहणेबाबत आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करणेत यावे. श्री सिध्दरामेश्वर यात्रेमध्ये सर्व सामान्य भाविकांना सहभागी होता येणार नसल्यामुळे मंदिरामधील सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था प्रमुख विश्वस्थ श्री सिध्दरामेश्वर देवस्थान सोलापूर यांनी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या निर्देशानुसार करावी.
३. श्री सिध्दरामेश्वर यात्रेच्या अनुषंगाने आरोग्य विषयक तपासणी, मास्क सॅनिटायझरचा वापर मंदिर व मंदिर परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही श्री सिध्दरामेश्वर देवस्थान समिती मार्फत करणेत यावे.
४. यात्रा कालावधीत श्री सिध्दरामेश्वर मंदिरात भाविकांना केवळ मुख दर्शनाची परवानगी राहील. त्याकरीता
ऑनलाईन दर्शन पास उपलब्ध करुन घेणे आवश्यक राहील
५. सन २०२२ च्या श्री सिध्दरामेश्वर यात्रेदरम्यान उपरोक्त संदर्भामध्ये नमूद केलेल्या शासन आदेश दिनांक २७/११/२०२९ व त्यानंतर वेळोवेळी निश्चित केलेल्या मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure SOP) चे पालन करणे सर्व संबंधीतावर बंधनकारक राहील.
६. कोविड १९ व ओमिक्रॉन संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी, स्थानिक व सर्व संबंधीत नगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
७. श्री सिध्दरामेश्वर यात्रा कोविड १९ व ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करणेत येत आहे. सदर यात्रेस ८०० ते ९०० वर्षाची परंपरा असल्याने सदर कोविड १९ व ओमिक्रॉन संसर्गामुळे प्रतिबंध होऊ नये यादृष्टिने आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त, महानगरपालिका प्रशासन व अध्यक्ष श्री सिध्दरामेश्वर मंदिर समिती यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून संयुक्त जबाबदारीने यात्रा यशस्वीरित्या पार पडेल यांची सुनिश्चिती करावी. पोलीस आयुक्त यांनी याकरिता आवश्यकतेप्रमाणे साथरोग अधिनियम १८९७ आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियम २००५ महाराष्ट्र राज्य कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजना नियम २०२० मधील तरतुदी विचारात घेऊन आदेश निर्गमित करावेत.
८. कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीस पास देणेत यावा. पासवर फोटो, नांव, पत्ता, कार्यक्रमाची तारीख व वेळ ठिकाणी नमूद असावे.
९. संबंधीतांनी पास धारकांची यादी पोलीस प्रशासनाला आगाऊ कळविणेत यावी जेणेकरुन गर्दावर नियंत्रण
ठेवता येईल.
१०. कोरोना व ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण विचारात घेता यात्रा काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अखंड चालू असलेल्या परंपरेस बाधा होऊ नये या दृष्टिकोनातून ज्यांचे लसीचे २ डोस पूर्ण झाले आहेत व ज्यांची ४८ तासातील RT PCR चाचणी निगेटिव्ह आहे अशाच यात्रेचे मानकरी, नंदी ध्वजधारक, सेवेकरी या लोकांना सहभागी होणेच्या अनुषंगाने पासेस पोलीस आयुक्त यांचेमार्फत देणेत येईल. त्याबाबतची यादी देवस्थान समितीने किमान ०२ दिवस आधी पोलीस विभाग व महापालिका यांना सादर करावी.


















