Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : महापालिका आयुक्त शिवशंकर यांचे नवे आदेश सोलापूर शहरात भागात राहणार आता असे निर्बंध

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 January 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


ज्याअर्थी ओमिक्रॉन कोविड १९ व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या विषाणूचा प्रसारचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात प्रसार जास्त होण्याची शक्यता असल्याने शासनाकडील संदर्भ क्र. ७ व ८ चे आदेशानुसार कोविड १९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध करणेसाठी साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध जारी करण्याचे आदेशित करणेत आलेले आहे.


ज्याअर्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च, २०२० अन्वये कोरोना विषाणु (काव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे, आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून, महानगरपालिका आयुक्त हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविङ १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.


त्याअर्थी, मी पि. शिवशंकर, भा.प्र.से. आयुक्त सोलापूर महानगरपालिका, साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोरोना (कोविड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरुन सोलापूर शहर हद्दीत सार्वजनिक हिताच्या दृष्टिने खालील सूचना / आदेश निर्गमित करीत आहे. सदरचे निर्बंध दि. १०/०१/२०२२ चे रात्री ००.०० पासून लागू राहतील.


१) सोलापूर शहरातील खालील नमूद बाबींवर पुढील प्रमाणे निर्बंध लागू राहतील.


क्षेत्र| लागू केलेले निर्बंध


नागरिकांचे बाहेर फिरणे


| सकाळी ०५ ते रात्री ११.०० या कालावधीमध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. तसेच रात्री ११.०० ते सकाळी ०५.०० या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल.


शासकीय कार्यालये


अ) कार्यालय प्रमुखांच्या स्पष्ट आणि लेखी परवानगीशिवाय अभ्यगतास कार्यालयास प्रवेशास मनाई असेल.


ब) मुख्यालयाच्या बाहेरुन येणाऱ्या सर्व उपस्थितांची कॉन्फरन्सद्वारे (VC) वर बैठका आयोजित कराव्यात.


क) कार्यालय प्रमुख हे गरजेनुसार घरून काम करणेस प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचा-यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या


वेळांमध्ये बदलाचा विचार करु शकतील. ड) कार्यालयामध्ये कोविड अनुरुप वर्तनाचे कठोर पालन होईल याबाबत कार्यालय प्रमुखांनी काळजी घ्यावी. इ) सर्व कार्यालय प्रमुखांकडून थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन दयावे.


अ) कार्यालय व्यवस्थापनाने घरुन काम करणेस प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये २४ तास सुरु ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबत विचार करतील. कार्यालयीन कामकामाच्या वेळा २४ तास असल्याने रात्री ११.०० ते सकाळी ०५.०० या कालावधीत प्रवास करणे झालेस ओळखपत्र दाखवून प्रवासास परवानगी असेल. अशा प्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील. ब) केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणेस परवानगी असेल. लसीकरण न केलेल्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण लसीकरणासाठी जाण्यासाठी प्रोत्साहित करावे. क) सर्व कर्मचारी कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोरपणे पालन करतील याची कार्यालयीन व्यवस्थापनाने दक्षता घ्यावी. ड) सर्व कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन दयावे.


लग्न समारंभ


लग्न समारंभास जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थित राहणेस परवानगी असेल. तथापि, संबंधीत विभागीय कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक असेल. अंत्यसंस्कार आणि अंतिम संस्कार या कार्यक्रमाध्ये जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित अंत्यसंस्कार

आणि

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय / संमेलन / कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थित राहणेस परवानगी असेल.


शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस दि. १५/०२/२०२२ रोजी पर्यंत पुर्णपणे बंद राहतील.


तथापि, खालील बाबी यामधून वगळण्यात येत आहेत. १) विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवावयाचे उपक्रम


२) प्रशासकीय कामकाज व शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करावयाचे कामकाज, ३) शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास विभाग किंवा कोणत्याही वैधानिक प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम.


जलतरण तलाव, स्पा, वेलनेस सेंटर.  पुर्णपणे बंद राहतील


४) यानिर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडून परवानगी घ्यावी लागेल.

जिम :

१) ५०% क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी असेल. तथापि व्यायाम करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.


२) केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना त्या सेवेचा वापर करणेस परवानगी असेल.


केश कर्तनालये


३) कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक राहील १) ५०% क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी असेल.


व सौंदर्य केंद्रे


(ब्युटी सलून)


२) दररोज रात्री १०.०० ते सकाळी ०७.०० पर्यंत पूर्ण बंद असेल. ३) एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. ४) केश कर्तनालयामध्ये कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोरपणे पालन करावे तसेच काम करणारे सर्व व्यक्तींचे तसेच ग्राहकांचे लसीकरण पूर्ण झाले असणे बंधनकारक असेल. हे तपासण्याची सर्वस्वी जबाबदारी केश कर्तनालयाच्या मालकाची राहील. ५) ब्युटी सलूनमध्ये अशीच सेवा देण्यात येईल ज्यात तोंडावरील मास्क काढणे आवश्यक नसेल.


६) अशी सेवा घेणारे व्यक्तीचे व यात काम करणाऱ्या सर्व व्यक्तीचे पूर्ण लसीकरण झालेले असावेत.


खेळांचे स्पर्धा


१) आधीच नियोजित केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खालील अटीवर आयोजित करणेस परवानगी राहील. तसेच इतर स्पर्धा पुढे ढकलण्यात येतील.


(अ) प्रेक्षकांना उपस्थित राहणेस बंदी असेल,


ब) सर्व खेळाडू आणि अधिकारी यांच्या हालचाली बायो-बबलमध्ये असतील. क) सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडू यांना भारत सरकारचे कोविड अनुरुप नियमांचे पालन करणे बंधनकारक राहतील.


ड) खेळाडू आणि अधिकारी यांची RAT-RTPCR चाचणी प्रत्येक तिसऱ्या दिवशी घेणे बंधनकारक असेल. २) शहर किंवा जिल्हास्तरीय क्रिडा शिबिरे / स्पर्धा/कार्यक्रम आयोजित करणेस मनाई


असेल. मनोरंजन उद्याने, प्राणीसंग्रहालय, वस्तु संग्रहालये, किल्ले आणि

अन्य सशुल्क ठिकाणे / कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे

पुर्णपणे बंद राहतील.


शॉपिंग मॉल,


अ) ५०% क्षमतेने चालू राहतील. संबंधीत आस्थापनांनी पूर्ण क्षमतेची माहिती तसेच वर्तमान अभ्यागतांची संख्या सर्व अभ्यागतांच्या माहितीसाठी आस्थापनाच्या बाहेरील सूचना फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. ब) अभ्यागत व कर्मचारी यांचेकडून कोविड अनुरुप वर्तनाचे कठोर पालन होईल याची


बाजार समिती, भाजीपाला मार्केट आठवडी बाजार. व दक्षता घेण्यासाठी आस्थापनांनी मार्शल्स नेमावेत.


क) RAT टेस्टिंग बूथ / किऑस्क ठेवावेत.


ड) पुर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेशास परवानगी राहील. ई) रात्री १०.०० ते सकाळी ०८.०० या कालावधीत संबंधीत आस्थापना पुर्णपणे बंद राहतील.


फ) भाजीपाला / फळ विक्रेते, दुकानदार व आठवडी बाजारमधील विक्रेते यांचे लसीचे दोनही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. तसेच दि.१० ते १४ जानेवारी २०२२ पर्यंत चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दि. १५/०१/२०२२ पासून र.रु.१,०००/- इतका दंड करणेत येईल.


अ) ५०% क्षमतेने चालू राहतील. संबंधीत आस्थापनांनी पूर्ण क्षमतेची माहिती तसेच वर्तमान


रेस्टॉरंट, उपहारगृहे

अभ्यागतांची संख्या सर्व अभ्यागतांच्या माहितीसाठी आस्थापनाच्या बाहेरील सूचना फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. ब) पुर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तीनांच प्रवेश परवानगी राहील.


क) रात्री १०.०० ते सकाळी ०८.०० या कालावधीत संबंधीत आस्थापना पूर्णपणे बंद राहतील. सर्व दिवस सकाळी ०७.०० ते रात्री ११.०० वा. पर्यंत घरपोच सुविधा चालू ठेवणेस परवानगी असेल. तसेच पार्सल सुविधा देणारे कर्मचारी यांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे.


नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स

अ) ५०% क्षमतेने चालू राहतील. संबंधीत आस्थापनांनी पूर्ण क्षमतेची माहिती तसेच वर्तमान अभ्यागतांची संख्या सर्व अभ्यागतांच्या माहितीसाठी आस्थापनाच्या बाहेरील सूचना फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.


ब) पुर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तीनांच प्रवेश परवानगी राहील. क) रात्री १०.०० ते सकाळी ०८.०० या कालावधीत संबंधीत आस्थापना पूर्णपणे बंद राहतील. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय प्रवासास परवानगी असेल.


आंतरराष्ट्रीय प्रवास, देशांतर्गत प्रवास

कोविडरोधी दोन लसी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी ७२ तासापूर्वीपर्यत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल प्रवास करणेस ग्राह्य धरण्यात येईल. हे हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गानी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. प्रवास करणारे वाहनचालक, वाहक आणि अन्य सह्योगी कर्मचाऱ्यांनाही लागू राहील. माल वाहतूक, औद्योगिक उपक्रम, बांधकाम उपक्रम फक्त पूर्ण लसीकरण झालेल्या


माल वाहतूक, औद्योगिक |व्यक्तींद्वारे नियमित वेळेनुसार चालू ठेवणेस परवानगी राहील. उपक्रम,

बांधकाम उपक्रम सार्वजनिक वाहतूक

UPSC/MPSC/2 वैधानिक प्राधिकरण/सार्व

जनिक संस्था इत्यादीद्वारे परीक्षांचे आयोजन


नियमित वेळेनुसार पुर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना प्रवास करणेस परवानगी राहील.


अ) राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार पार पाडल्या जातील. अशा परीक्षासाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यक सिध्द करण्यास पुरेसे असेल.


ब) राज्यस्तरावर आयोजित सर्व स्पर्धात्मक परीक्षा जेथे हॉल तिकीट आधीच जारी केले गेले आहेत आणि परीक्षेच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पाडतील अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या मंजूरीनंतरच पार पाडल्या जातील.


(क) परीक्षेचे आयोजन कोविड अनुरुप वर्तन मार्गदर्शक तत्वानुसार केले जाईल.


२) खालील बाबींचा प्रवासासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कारणांमध्ये समोवश असेल


1) वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती. ii) अत्यावश्यक सेवा (सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मधील सर्व सेवा)


iii) विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथून वैध तिकिटासह प्रवास करता येईल. तसेच परवानगी देणेत आलेल्या स्पर्धा परिक्षांचे प्रवेशपत्रासह प्रवास करता येईल. iv) २४ तास सुरु असणाऱ्या कार्यालयासाठी विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांचा प्रवास अत्यावश्यक मानला जाईल. ३) सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मधील कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणे सर्व व्यक्तींवर बंधनकारकअसेल.


३) दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा e-commerce, मध्ये गुंतलेल्या कोणत्याही आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी तसेच होम डिलिव्हरी करणारे कर्मचारी यांचे पूर्ण लसीकरण केलेले असणे बंधनकारक असेल. वरील बाबी तपासण्याची सर्व जबाबदारी संबंधीत आस्थापना / व्यवस्थापनावर राहील व त्यांस संबंधीत व्यवस्थापनास जबाबदार धरले जाईल. सदर बाबींचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना ७ दिवस बंद करणेत येतील.


8)सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी / विभागीय अधिकारी व अधिनस्त कर्मचारी यांनी कारवाई करावी.






SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश सोलापूरच्या ग्रामीण भागात राहणार आता असे निर्बंध

Next Post

सोलापूर | स्वामींचा ‘प्रकोप’, लोहारवर ‘हातोडा’ ; काय राव ‘भास्कर’ “हे वागणं ‘बाबा’बरं नव्ह”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | स्वामींचा 'प्रकोप', लोहारवर 'हातोडा' ; काय राव 'भास्कर' "हे वागणं 'बाबा'बरं नव्ह"

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971587
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group