सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोटि-१९ च्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी इकटील दि.०७/०५/२०२१ च्या आदेशातील अत्यावश्यक सेवा ssential Category) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस रोज सकाळी 6.00 से दूधारी २.०० वाजेपर्यंत चालू राहतील.
२. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे दिवशी सकाळी ७.०० ते दुपारी २.०० सर्व दिवस (Working Days) सुरु राहतील.
३. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने (Non essential Shops-Stand alone shop and not inside shopping centers Malls) सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० से दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच संबंधित आस्थापनेकडील आस्थापना मालक / चालक तसेच आस्थापनेशी संबंधित कामगार यांचे विहित मुदत असलेले RAT/RT-PCR Negative टेस्ट रिपोर्ट किंवा लसीकरण प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील.
४. हॉटेल/रेस्टॉरंट व बार हे पार्सल सेवेकरीता सकाळी ७.०० ते दुपारी २.०० पर्यंत सुरु राहतील. दुपारी २.०० ते रात्री ८.०० पर्यंत फक्त घरपोच सेवेकरीता (Home Delivery) सुरु राहतील.
५. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तु (Essential / Non essentia) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.
६. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात दररोज दुपारी ३.०० नंतर वैद्यकीय व इतर
अत्यावश्यक कारण (Valid Reason) / अत्यावश्यक सेवा वगळता नागरीकांना घराबाहेर
पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध (संचारबंदी) राहील. तसेच घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित
करण्यात आलेल्या आदेशास अनुसरून परवानगी असेल.
७. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोना विषयक
कामकाज करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त) २५% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. ८. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इ.) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती या
आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
९. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. १०. सर्व प्रकारची शासकीय रास्त भाव दुकाने ही सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत
वितरणाकरीता सुरु ठेवण्यात यावीत.
११. यंत्रमाग, गारमेंट व विडी उद्योग या आस्थापना शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करून सकाळी ७.०० दुपारी २. वाजेपर्यंत सुरु राहतील. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना चाचणी केलेला ICMR क्रमांक असलेला वैद्यकिय अधिकारी यांचा स्वाक्षरी असलेला वैध छापील विहित मुदत असलेले RAT/RT PCR Negative Report किंवा लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.
१२. सोलापूर महानगरपालिकेकडील आदेश दि.०५/०४/२०२१, २०/०४/२०२१. १४/०५/२०२१, ३१/०५/२०२१ अन्वये व यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.


















