सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर शहर हद्दीतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत चे वर्ग सुरू करण्याचे आदेश सोमवारी सायंकाळी काढले असून शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी काही निर्बंध शाळेला घालून दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात काय म्हटले ते पाहूया..
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील पूर्व प्राथमिक व इयता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना संदर्भीय शासन परिपत्रक क्रमांक 1 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. तथापी संदर्भीय परिपत्रक क्रमांक 1 व 2 मध्ये दिनांक 24 जानेवारी 2022 पासून शाळा सुरु करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका यांना अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यानुसार शहारातील कोविड 19 चा प्रभाव कमी न झाल्यामुळे पूर्व प्राथमिक व इयता 1 ली ते 12 यी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संदर्भीय पत्र क्रमांक 3 अन्वये घेण्यात आलेला होता.
सद्यस्थितीत सोलापूर महानगरपालिक क्षेत्रातील कोविड 19 चा प्रादुर्भाव, शिक्षकांचे कोविड 19 च्या चाचण्या व लसीकरण तसेच विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता मंगळवार दिनांक 01/02/2022 पासून पूर्व प्राथमिक व इयता ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यास उपरोक्त शासन परिपत्रकात नमूद तसेच खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी राहील.
मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती शालेय व्यवस्थापन, पालक शिक्षक संघ यांचे मदतीने सर्व बाबी लक्षात घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी करावी. शाळा सुरक्षितपणे व योग्य वातावरणात सुरु करणेची जबाबदारी मुख्याध्यापकांची असल्यामुळे शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल असे नियोजन करावे. शाळा पूर्वतयारी पूर्ण झालेबाबत लेखी अहवाल ज्या मुख्याध्यापकांनी अद्याप सादर केला नाही, त्यांनी आजच तात्काळ पर्यवेक्षक यांचेकडे सादर कराया.
शाळाभेटीवेळी ज्या शाळांमध्ये कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही,
त्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांचेवर निश्चित करुन दंडात्मक कार्यवाही केली जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित पर्यवेक्षक यांनाही जबाबदार धरले जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. प्रत्येक दिवशी याबाबत गांभीर्याने कार्यवाही होईल यासाठी ख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापन यांनी कटाकक्षाने लक्ष याये, आपल्या दुर्लक्षामुळे एकही विद्यार्थी किंवा शिक्षक कोविड पॉझीटव्ह होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनाचे नियमित पालन करुनच शालेय कामकाज पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
कौविड -19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचे,
मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील.
सदर आदेश दिनांक 01/02/2022 पासून सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.

















