मंगळवेढा : पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. जून महिन्याची 23 तारीख उजाडली तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यातच आषाढी वारी सुरू आहे विविध संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. सर्वांनीच पाऊस पडू दे असे साकडे संतांच्या चरणी घातले आहेत.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारच्या सुमारास संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढ्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे भागात आकाशात ढग जमा होऊन वादळी वाऱ्यासह बराच वेळ जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसानंतर पाऊस आल्याने मंगळवेढा भागातील नागरिकांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस ला हे पावसाचे व्हिडिओ ठेवले आहेत.


















