सोलापूर : सोलापुरातील पोलीस निरीक्षकाने पुण्यातील जुना गुन्हा मिटवून घेण्यासाठी पुणे हडपसर इथे राहणाऱ्या एका 50 वर्षाच्या महिलेला घरी बोलावून जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याने विजापुर नाका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवान माने नेमणूक महिला प्रशिक्षण, केगाव, राहणार मधुबन सोसायटी, विजापूर रोड, असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
यापूर्वी पोलीस निरीक्षक माने याच्या विरोधात समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दि. 23/09/2020 रोजी गु.र.नं. 1025 2020 भा.द.वि.376 (2) (N), 354 (C),328, 417,504, 506,507 अन्वये गुन्हा दाखल केला
आहे. दरम्यान महिलेने दिलेल्या फिर्यादीत, दि.26/12/2021 रोजी सकाळी 10.30 वा च्या सुमारास चंद्रकांत भगवान माने याने फिर्यादी महिलेस त्याच्या राहत्या घरी मधूवन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर येथील घरी बोलावून घेतले, तु पुण्यात दाखल असलेला गुन्हा मिटयून घे आपण पहिल्यासारखेच राहू. त्यावेळी मी त्यांना कोर्टातून जे निकाल लागेल ते लागेल असे त्यांना म्हणाले. मला तू माझ्यावरील केस मागे घे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. असे मला धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीने, आपले प्रकरण न्यायालयात चालू आहे.
तू मला लग्नाचे | अमिष दाखवून फसवलेले आहेस मी केस मागे घेणार नाही. तेव्हा आरोपी यांने दरवाजा | आडवा करून माझ्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा फिर्यादीने मोबाईल त्याला दिला नाही. त्यानंतर हात पकडून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले त्यानंतर चंद्रकांत माने याने परत तू माझ्यावरील केस मागे घे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. असे मला धमकी दिली.. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगीराज गायकवाड हे करत आहेत.

















