Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग | पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेश | सिद्धेश्वर यात्रा काळात पाच दिवस असा राहणार पोलीस बंदोबस्त

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : ज्याअर्थी दि. १२/०१/२०२२ ते दि. १६/०१/२०२२ या कालावधीत सन २०२२ च्या श्री सिध्दरामेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.


पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीत श्री सिध्दरामेश्वर यात्रेस महाराष्ट्र शासन व आयुक्त, सोलापूर महानगर पालिका, सोलापूर यांनी वरील संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने उचित प्रतिबंधात्मक / कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता सदर यात्रा कालावधीत कोवीड- १९ व ओमायक्रॉन या संसर्गजन्य साथ रोगाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी श्री सिध्दरामेश्वर यात्रा ही दिलेल्या निर्देशानुसार पार पाडण्याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत.


त्या अनुषंगाने मी हरीश बैजल, पोलीस आयुक्त सोलापूर शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन शासनाच्या दि.०१/०४/१९७४ च्या अधिसुचनाव्दारे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सोलापुर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २ (१) नुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन दैनंदिन जनजीवनातील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांची गरज लक्षात घेता वरील कायद्यांचे व शासन निर्णयांचे अधिन राहुन १२ जानेवारी, २०२२ रोजीचे रात्री ००.०१ वा. पासून ते १६ जानेवारी रोजीचे रात्री २४.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश लागू करीत आहे.


सदर आदेश पारीत करण्याची बाब ही तातडीची व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याने त्याकामाची संबंधितास नोटीस देणे शक्य होणार नाही असे आमचे मत आहे. ०१. सदरचा आदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) मंगळवेढेकर इंस्टिटयुट कॉर्नर इ हरिभाई देवकरण प्रशाला समोरील रस्ता स्ट्रीट रोड सिध्देश्वर कन्या प्रशाला समोरील रस्ता वनश्री नर्सरी विष्णु घाट गणपती घाट सरस्वती कन्या प्रशाला भुईकोट किल्याच्या आतील परिसर चार पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) अशा ठिकाणांसह आतील सर्व परिसरात संचार बंदी आदेश लागू राहील.


०२. सदर परिसरातील रहिवासी यांनी प्रवेशा संदर्भात रहिवासाच्या पुराव्यासह संबधीत पोलीस ठाणेकडून पासेस प्राप्त करुन घ्यावेत. इतर बाहेरील व्यक्तींना सदर परिसरात प्रवेशास मनाई असेल.


०३. शासनाच्या वतीने संबंधित ठिकाणी सेवा बजाविणारे व्यक्ती स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगतील. तसेच सदर भागात अत्यावश्यक सेवा बजाविणारे व्यक्ती व त्याचे शासकीय वाहनांना प्रवेशास परवानगी असेल.


०४. सदर परिसरात संचारबंदी असल्याने, सोलापूर जिल्हा व जिल्हयाबाहेरील राज्याबाहेरील सर्वसामान्य जनतेला प्रवेशास मज्जाव असेल. ०५. सदर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन डिजीटल पास घेणे बंधनकारक राहील.


ऑनलाईन पास असलेल्या व्यक्तींनांच सदर परिसरात प्रवेश दिला जाईल. पासधारक भाविकांनी त्यांना नेमुन दिलेल्या वेळेतच येणे आवश्यक आहे. ०६. होम मैदान येथील मॉर्निंग वॉक, मैदानी खेळ, सराव, सेल्फी पॉईट वगैरे करिता मैदान बंद राहील,


सदर ठिकाणी प्रवेशास मनाई असेल. ०७. नमूद कालावधीत सदर परिसरातील अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना वगळून इतर सर्व दुकाने/


आस्थापना बंद राहतील. ०८. सदर परिसरात धार्मिक विधीकरिता मर्यादित वाहनांना प्रवेशास परवानगी असेल. तथापि वाहनांसाठी ०९. मंदिर परिसरात मनोरंजन व करमणूकीचे संबंधित दुकाने खाद्यपदार्थ, पूजा साहित्य विक्री वगैरे दुकानांना परवानगी नसल्याने संबंधित दुकानदारांना सदर परिसरात प्रवेश बंदी असेल. १०. मंदिर परिसरात यात्रा भरविण्यास मनाई असल्याने शहर, जिल्हा, राज्य व राज्याबाहेरील सर्वसामान्य


जनतेला यात्रेस मनाई राहील. ११. सदर कालावधीत मंदीर परिसरात परवानगी व्यतिरिक्त इतरत्र नंदीध्वज मिरवणूक, पालखी मिरवणूक, वाद्यपथक इत्यादी बाबींना मनाई असेल.


१२. सदर प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या आतषबाजी व शोभेचे दारुकाम यास मनाई असेल. १३. कोविड- १९ व ओमायक्रॉन या विषाणूंचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरन वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.


१४. मंदिरातील दैनदिन पुजा-अर्चा, धार्मिक विधी इत्यादी बाबत पुजान्यांना मर्यादित संख्येमध्ये प्रवेशास परवानगी असेल तथापि त्याबाबत संबंधित पोलीस ठाणेकडून प्रवेश पास घेणे बंधनकारक असेल.


त्याअर्थी मी हरीश बैजल, पोलीस आयुक्त सोलापूर शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन शासनाच्या दि.०१/०४/१९७४ च्या अधिसुचनाद्वारे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सोलापुर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१), (३) अन्वये साथरोग अधिनियम १८९७ च्या खंड २ (१) नुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन दैनंदिन जनजीवनातील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांची गरज लक्षात घेता वरील कायद्यांचे व शासन निर्णयांचे वरील अ.क्र. ०१ ते १३ बाबींच्या उल्लंघनास मनाई करीत आहे. सदर बाबींचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ २६९ २७० व इतर कायद्यांमधील तरतुदीनुसार कायदेशीर/ दंडनीय कारवाईस प्राप्त असून त्यांचे विरुध्द संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी.


या आदेशाचे सार्वजनिक हिताच्या उद्देशाने अंमलबजावणी करण्याच्या इराद्याने केलेल्या किंवा करण्याच्या ठरविलेल्या बाबी संबंधाने अशा व्यक्तीविरुध्द कोणताही दावा अथवा न्यायिक कार्यवाही करता. येणार नाही. सदर आदेश हा माझ्या सही शिक्क्यानिशी आज दि.१०/०१/२०२२ रोजी पारित केला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : समाज कल्याण सभापतींसह सदस्यांनी केला सभात्याग | प्रशासना विरोधात अ’संतोष’ का?

Next Post

सोलापूर | जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांची सिव्हीलच्या ऑक्सिजन प्लांटला अचानक भेट ; दिल्या या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांची सिव्हीलच्या ऑक्सिजन प्लांटला अचानक भेट ; दिल्या या सूचना

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971588
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group