पंढरपूर ! कोरोना संसर्गाच्या सावटात यंदाची सुध्दा आषाढी एकादशी होत आहे, 20 जुलै रोजी आषाढी एकादशीला शासकीय पूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. आषाढी एकादशीच्या दिवशीची शासकीय पूजा, 10 मानाच्या पालख्याचे नियोजन, पोलीस बंदोबस्त, संचारबंदी, आरोग्य यंत्रणा याबाबत या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली…..


















