सोलापूर : स्वतः च्या फायद्यासाठी एका महिलेला घरात ठेवून तिला पैशाचे अमिष दाखवून तिच्या कडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिथुन एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.
सुनंदा शिवानंद जेंबगी (स्वामी) वय ३७ वर्ष, रा. घर नं. १७१/१७२, जोडभावी पेठ चाटला चौक सोलापुर (घरमालकीन) २) दत्ता हरिभाऊ भोसले वय ४७ वर्ष, रा. मड्डी वस्ती, जोशी गल्ली, सोलापुर यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जोडभावी पेठ चाटला चौक येथे बेकायदेशीरपणे कुटुंणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने या बातमीवरुन २५ जानेवारी २०२२ रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी बोगस गि-हाईक पाठवून बातमीचे खात्री करुन घेतली त्यानंतर तिथे दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकुन कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हयातील महिला आरोपी सुनंदा जम्बगी व दत्ता चौगुले या दोघांनी संगनमत करुन एक पिडीत महिलेस आपल्या राहत्या घरात अटकावुन ठेवून त्यांची शारीरिक पिवळणुक करुन तिला पैशाचे अमिश दाखवुन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुवुन घेऊन त्यांच्या कमाईवर स्वतः ची उपजिवीका करीत असताना मिळुन आले. त्याचेविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ भा.द.वि.सं. कलम ३७० (अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करुन एक पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील पोनि विजयालक्ष्मी कुर्री या करत आहेत.


















