सोलापूर शहरातील मौलाली चौक परिसरातील डिके सोशल ग्रुपचे अध्यक्ष मोहसीन सलिम नदाफ यांच्या तडीपारीची ऑर्डर उच्च न्यायालयात रद्द करण्यात आली, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोहसिन नदाफ यांनी एमआयएम पक्षाचे काम केले, त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व नदाफ यांचे भांडण झाले हे भांडण हाणामारीवर गेले त्यामुळे दोन्ही गटा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणानंतर गुन्हे दाखल झाले, त्यानंतर मोहसिन नदाफ यांना तडीपार करण्यात आले होते. नदाफ यांनी एडवोकेट साजिद अहमद बागवान यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात तडीपारी रद्द करण्यासाठी अर्ज केला होता तो अर्ज मंजूर झाला आणि मोहसिन नदाफ यांची तडीपारी उच्च न्यायालयाने रद्द केली आहे दरम्यान याबाबत एडवोकेट बागवान यांनी अधिक माहिती दिली.



















