सोलापूर : तुळजापूर रस्त्यावरील तळे हिप्परगा उड्डाणपुलाच्या उतारावर तुळजापूर कडून सोलापूर कडे कांदे घेऊन येणारा आयशर टेम्पो मागचे टायर फुटून हायवे मधील कठड्याला धडकला आणि पलटी झाला.
या अपघातात टेम्पोचा दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
सुदैवाने या अपघातात टेम्पोचा चालक आणि वाहक दोघेही बचावले रस्त्यावरच हा टेम्पो उलट्या दिशेने जावून पलटी झाला. शेजारी समांतर कोणते वाहन नसल्याने अनर्थ टळला.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात झाल्याने पाहणाऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती, रस्त्यावरून येणारा जाणारा थांबून या अपघाताची पाहणी पाहणी करत होता, पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली.

















