सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा शुक्रवारी पार पडली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती दिलीप चव्हाण हे उपस्थित नसल्याने सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.
या सभेला पक्षनेते अण्णाराव बाराचारे, सदस्य अतुल खरात, सदस्य रेखा राऊत, स्वाती कांबळे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव व त्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी शुल्क वाढीचा विषय सभेसमोर होता यावेळी पक्षनेते बाराचारे हे आक्रमक दिसून आले त्यांनी सिमेंट कारखाना साखर कारखाना परमिट रूम बियर बार बिअर शॉपी अशांना एनओसी ची रक्कम दुप्पट करण्याच्या सूचना केल्या तसेच दोन वर्षानंतर जे नूतनीकरण होते ते केवळ पंचवीस टक्के आकारणी होते मात्र त्या 25 ऐवजी 50 टक्के करण्याचा ठराव या सभेमध्ये एकमताने मंजूर झाला.
सर्वप्रथम सोलापूर जिल्हयातील कोविड साथजन्य परिस्थिती आटोक्यात आणल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव व त्यांचे टिमचे अभिनंदन करण्यात आले.
सोलापूर जिल्हयामध्ये कोविडचे उत्कृष्ठरित्या व नियोजनबध्द पध्दतीने राबवून राज्यात दुस-या क्रमांकाचे लसीकरण पूर्ण केल्याबद्दल आरोग्य समितीच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच डॉ अनिरुध्द पिंपळे RCHअधिकारी व त्यांच्या टीमचा जाहिर सत्कार करण्यात आला.
अत्याधुनिक पध्दतीची Abulance स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या स्मरणार्थ जनतेच्या सेवेसाठी भोसे ग्रामस्थांच्या वतीने लोकार्पण करणार असल्याची माहिती अतुल खरात यांनी दिली. पुढील काळात गाव, वाडया-वस्ती, तांडा इत्यादी ठिकाणी तेथे जाऊन गावनिहाय कोविड लसीकरण करण्यात यावे. अशा सुचना सदस्यांनी मांडल्या.


















