पुणे : जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध करण्यासाठी आठ लाखाची लाच मागून 190000 स्वीकारताना जिल्हा जात पडताळणी समिती पुणे विभागाचे सदस्य तथा उपआयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
नितिन चंद्रकांत ढगे वय ४०, पद-उपआयुक्त* तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे, वर्ग-1, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असे पोलिसांनी लाच घेताना ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्याकरिता सुरूवातीस 8 लाख रुपये लाचेची मागणी नितीन ढगे यांनी केली होती, पडताळणी दरम्यान तीन लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले, त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी लाच मगितल्याची पडताळणी करण्यात आली, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सापळा रचून रात्री पावणे दहाच्या सुमारास ढगे याच्या वानवडी निवासस्थाना जवळ 1,90,000 रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले .
हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक-सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे,
पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पो.शि.अंकुश आंबेकर, पो.शि. सौरभ महाशब्दे, चालक पो.शि. चंद्रकांत कदम यांनी यशस्वी केला.
दरम्यान नितीन ढगे यांना अटक केल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या राहत्या घराची रात्रभर झडती घेतली.
रविवारी त्यांच्या घराची झडती संपली. या झडतीमध्ये रोख 1 कोटी 28 लाख 49 हजार रुपये, मालमत्तांची कगादपत्रे यासह 2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली आहे.
कारवाई दरम्यान आढळून आलेल्या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

















