जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी नवा आदेश काढला. या आदेशामध्ये कोविड रुग्णालय व त्याच्या परिसरात कोणत्याही व्यक्ती विनाकारण फिरणार नाहीत, गर्दी करणे, रुग्णाला भेटायला जाण्याचा प्रयत्न करणे असे आढळल्यास प्रतिव्यक्ती पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. रुग्णांचे नातेवाईक अथवा अन्य व्यक्तीकडून कोविड रुग्णालयांमध्ये बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई असेल. दिसून अशा कृत्यात म्हणायचे असेल रुग्णांशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना रुग्णालयात किंवा रुग्णालयाच्या परिसरात रुग्णालयाच्या परवानगीशिवाय प्रवेश नसेल संबंधित रुग्णालयात केवळ नेमणूक केलेले संबंधित रुग्णाचे नातेवाईक यांना अत्यावश्यक कामासाठी दवाखान्याच्या व्यवस्थापनाच्या परवानगीने प्रवेश राहील, त्यासाठी हॉस्पिटलचे ओळखपत्र बंधनकारक आहे इतरांना प्रवेश असणार नाही.




















