सोलापूर शहरांमध्ये मागील वर्षभरामध्ये कोरोणाच्या काळात मृत झालेल्या व्यक्तींचा महापालिकेच्या माध्यमातून अंत्यविधी विद्युतदाहिनी तसेच गॅस दाहिनी वरती करण्यात येत होते.सोलापूर महानगरपालिका हद्दीतील विविध सेवाभावी सामाजिक संस्थाच्या मार्फत कोविड 19 ने मृत पावलेल्या व्यक्तिवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. दरम्यान आयुक्त यांच्या आदेशाने त्यांच्या कडील कामकाज बंद करण्यात येऊन सदरचे कामकाज महापालिका कर्मचाऱ्यां मार्फत करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तसेच मृत व्यक्तींचा सुद्धा संख्या कमी झाल्याने शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचा सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने यापुढे महापालिका कर्मचारी हे अंत्यविधी करण्यासाठी विद्युत दाहिनी व गॅस दाहानीची व्यवस्था असून यापुढे कुठलेही सेवाभावी संस्था अथवा संघटना यांना अंत्यविधी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली नाही. तरी शहरातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेकडे संपर्क साधावा किंवा महानगरपालिकेच्या आयडी एच हॉस्पिटल येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनील माने यांनी केले आहे.


















