सोलापूर : प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक KA 32 B 1777, ईरटीका कार क्रमांक MH 25 AL4070, बलकर ट्रक क्रमांक MH 12 SX 1171 व ट्रक क्रमांक TN 52 J3679 यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला .
अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याचे सपोनि अतुल भोसले, psi अजय हांचाटे,दासरी,वाळूनजकार,बनकर,गायकवाड,हनहोनमोरे,मोरे,सूर्यवंशी ,काळोखे असे पोलीस स्टाफ तसेच क्रेन व अंबुलन्स यांनी तात्काळ स्टाप सह जाऊन सदर ईरटीका कार मध्ये अडकलेले जखमीना नागरिक यांच्या मदतीने बाहेर काढले मदत कार्य 2 तास सुरू होते. या अपघातात 1.सचिन सुरेंद्र खटके वय 35, 2. सपना सचिन खटके 26, 3. परमेश्वर शिवाजी सोनटक्के 40, 4.पल्लवी गिरिष तिवारी 28, 5. तीन लहान मुले सर्व रा .उस्मानाबाद व 6)ट्रक चालक गणेशन जणांना सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता पाठवण्यात आले.
ट्रक क्रमांक TN52 J 3679 मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरता हॉस्पिटलला दाखल केले आहे. वेळेत मदतकार्य झाल्याने जीवित हानी टाळणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


















