काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या संतापानंतर नाराज झालेल्या माजी प्रवक्ते बसवराज बगले यांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. बगले यांच्या या प्रवेशावरून त्यांच्यासाठी जनवात्सल्य आणि काँग्रेस भवनचे दरवाजे बंद झाले होते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी घेतलेल्या ‘ अण्णा ‘ आणि ‘ भाऊ ‘ सोबत मुंबईला जाऊन दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील नेते बसवराज बगले यांनी मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी जागा आणि निधीची मागणी केली.उपमुख्यमंत्री अजित दादांनी त्याला हिरवा कंदील दिला.जागा देईन त्यानंतर निधीची सुध्दा तरतूद करेन अशी हमीच अजितदादांनी दिली.याचाच अर्थ लिंगायत समाजाला न्याय देण्याची आत्मियता अजितदादांनी दाखविली.त्यानंतर बसवराज बगले यांनी दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी भीमा आणि सीना नदीवर बंधारे निर्मितीसाठी सुध्दा हट्ट धरला.ती सुध्दा मागणी पूर्ण करण्याचा विश्वास दादांनी दिला आहे.त्याच्या मोबदल्यात बगले यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रवेश करून काम करण्याचा आग्रह माजी उपमहापौर दिलीप भाऊंनी धरला होता.
तीन महिन्यापूर्वीच बसवराज बगले यांच्याशी सोलापूर विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मोहोळचे नेते राजन पाटील यांनी चर्चा केली होती.मात्र डाॅ.धवलसिंह यांची साथ लाभल्याने त्यांना एक सक्षम पर्याय मिळाला होता,तरीही जो पर्यंत आपण काँग्रेस पक्षात आहोत तोपर्यंत “कार्य ” क्रम करत राहणार अशी भूमिका ठेवून त्यांनी पक्षात ” धवल नेतृत्वाला साथ ” दिली होती. तेंव्हाच .बगले यांचा ‘ गनिमी कावा ‘ अनेकांना जाणवला होता.
मात्र काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षातील कुटीर यांना चांगलाच दम भरला त्यानंतर बसवराज बगले यांचे कारस्थान पाहता प्रचंड संताप व्यक्त केला, हीच संधी साधून राष्ट्रवादीचे सूत्रधार महेश कोठे,शहर अध्यक्ष भारत जाधव,कार्याध्यक्ष संतोष पवार,सुधीर खरटमल,यु.एन बेरिया यांच्याशी चर्चा करून तडकाफडकी बगले यांनी मुंबई गाठली.आणि अजित दादांशी चर्चा करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान नवीन वर्षाच्या प्ररंभीच 1 जानेवारी रोजी राष्ट्रवादीला सुखद धक्का म्हणून डाॅ.बसवराज बगले यांच्यासह पंचवीस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत ऑनलाईन पध्दतीने पक्ष प्रवेश केला आहे. पूर्वीप्रमाणेच दक्षिण सोलापूर तालुक्यात आणि विधानसभा मतदार संघात सर्व जुने नवे सवंगडी सोबत घेऊन ते समन्वय घडवतील,तसेच लिंगायत समाजाला राष्ट्रवादीसोबत जोडण्यात बगले हे यशस्वी ठरतील अशीही चर्चा सुरु झाली आहे.

















