माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफ़ारसीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मोहम्मद अहमद खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा यांनी सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी झुबेर महिबुब कुरेशी यांची निवड केल्याचे सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांना कळविले आहे.
काँग्रेस पक्षाच्या सोलापूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष पदावर यापूर्वी माजी नगरसेवक तोफिक हत्तुरे हे होते. ते नगरसेवक झाल्यापासून अल्पसंख्याक शहराध्यक्ष पद बदलांच्या हालचाली सुरू होत्या. मागील तीन वर्षापासून झु कुरेशी यांच्या नावाची चर्चा होती परंतु त्यांना हे पद मिळण्यास काही वर्ष थांबावे लागले. शेवटी काँग्रेस पक्षाने त्यांना अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष पद दिले आहे. मुस्लिम समाजात काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पद महत्त्वाचे मानले जाते.
झुबेर कुरेशी यांची विजापूर वेस, किडवाई चौक, जिंदा शाहमदार चौक, शास्त्री नगर, या भागात चांगला परिचय आहे. मुस्लिम समाजातील युवकांमध्ये कुरेशी हे झेड बॉस या नावाने परिचित आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख असून आगामी महानगरपालिका तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला कुरेशी यांच्यामुळे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.



















