सोलापूर जिल्ह्याच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सचिव के वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रातील 14 जिल्हाध्यक्षांची निवड केली यामध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांचा सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी समावेश आहे.
सन 2016साली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाटील यांना काढून माळशिरस तालुक्यातील प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र मागील पाच ते साडेपाच वर्षाच्या कालखंडात प्रकाश पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे कोणतेही काम केले नाही त्यामुळे निश्चित प्रकाश पाटील यांची हकालपट्टी या पदावरून होणार अशी चर्चा होती.
जिल्हाध्यक्षपदासाठी धवलसिंह मोहिते पाटील माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नावाची चर्चा होती मात्र यामध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बाजी मारली आहे मागील सात महिन्यापूर्वीच धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता धवलसिंह मोहिते-पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच त्यांचे बंधू आमदार धीरज देशमुख हे आग्रही होते शेवटी त्यांच्या मागणीनुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदावर धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड केली. धवलसिंह यांच्या निवडीला सोलापूर जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता मात्र शेवटी त्यांची निवड झाली आता धवलसिंह मोहिते-पाटील हे कशा पद्धतीने काम करतात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांचा रोल कशा पद्धतीचा असेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल.


















