सोलापूर । एसटी कर्मचारी संघटनेत फूट पडली. एका गटाने अांदाेलनातून माघार घेतली. त्यामुळे साेलापूर अागारात मंगळवारी २० कर्मचारी सेवेत सामावून घेण्यासाठी हजर झाले. अाणखी काही कर्मचारी २२ डिसेंबरच्या न्यायालयीन सुनावणीकडे लक्ष ठेवून अाहेत.
राज्य परिवहन महामंडळ शासनाने विलीन करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या ४१ दिवसांपासून कर्मचारी संपावर गेले. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर अनेक बैठका झाल्या. संप मिटत नसल्याने थेट खासगी वाहने एसटी स्थानकावर अाणून प्रवासी वाहतूक सुरू झाली.
कामावर हजर न हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावण्याचा इशारा देण्यात अाला. त्यालाही संघटनांनी दाद दिली नाही. परंतु साेमवारच्या काही नाट्यमय घडामाेडींतून एका संघटनेने माघार जाहीर केली. त्यामुळे काही कर्मचारी कामावर रूजू झाले. त्यातून साेलापूरच्या अागारात २० जण हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. साेलापूर अागारातून मंगळवारी २० एसटी वाहने धावली. साेलापूर-पुणे शिवशाही नियमित आहे, परंतु पंढरपूर, बार्शी, सांगाेला, मंगळवेढा, माढा, करमाळ्याकडे गाड्या अद्यापही अनियमित अाहेत. मनुष्यबळ पूर्ववत झाल्याशिवाय सेवा पूर्ण क्षमतेने देणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे अाहे.

















