राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पंधरा मिनिटांसाठी सोलापूरच्या विमानतळावर येऊन गेले, उस्मानाबाद दौरा करून ते मोटारीने सोलापूर विमानतळावर आले त्याठिकाणी विविध संस्था संघटना तसेच काही कार्यकर्त्यांची निवेदन त्यांनी स्वीकारली यावेळी शहर कार्याध्यक्ष संतोष पवारयांनी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले, सोलापुरात मराठा समाजातील विद्यार्थिनींसाठी हॉस्टेल मंजूर आहे, मात्र त्यासाठी जागा उपलब्ध नाही ती जागा तातडीने मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. अजित पवार यांनी शेजारी थांबलेल्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तातडीने या विषयावर जागेचा प्रस्ताव पाठवावा अशा सूचना केल्या आहेत, सोमवारी या विषयावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बैठक लावली आहे, त्यानंतर उपलब्ध जागा पाहून तो प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.