सोलापूर : मंद्रूप अप्पल तहसीलदार पदी काम केलेल्या उज्वला सोरटे यांची दक्षिण सोलापूर तहसीलदार पदी शासनाने नियुक्ती केली आहे तशी ऑर्डर 12 जून रोजी काढण्यात आली.
दक्षिण सोलापूरचे तत्कालीन तहसीलदार अमोल कुंभार यांची पुनर्वसन तहसीलदार पदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर दुसऱ्या कुणाला नियुक्ती देण्यात आली नव्हती. दक्षिण सोलापूर तहसीलदार पदाचा अतिरिक्त प्रभार यापूर्वी नायब तहसीलदार गायकवाड आणि त्यानंतर मंद्रूप तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडे देण्यात आला होता. सध्या लिंबारे हे तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
उज्वला सोरटे यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदार होत्या. त्यानंतर तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नानंतर मंद्रूप येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात आले. त्या अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रथम तहसीलदार म्हणून उज्वला सोरटे यांनी काम पाहिले. त्यावेळी त्यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्त ठरल्याचे दिसून आले. त्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदली सातारा येथे करण्यात आली होती. शेवटी त्यांनी सोलापूरलाच येणे पसंद केले आणि दक्षिण सोलापूर तहसीलदार पदी आता त्यांची नियुक्ती झाली आहे.




















