भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा विधानसभेचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांचे सोलापुरात आगमन झाले ते दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.
सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास त्यांचे छत्रपती संभाजी चौकात आगमन झाले यावेळेस महापौर श्रीकांचना यंनम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सरचिटणीस बिजू प्रधाने यांच्यासह विविध पदाधिकारी नगरसेवकांनी शेलार यांचे जंगी स्वागत केले यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान पत्रकारांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारले असता या सरकारला जनतेपेक्षा मंत्र्यांच्या मुलांची सुरक्षितता महत्वाचे आहे असा टोला हाणत राज्यात दहीहंडी उत्सव पारंपरिक आणि कमी गर्दीच्या संख्येने करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी केली…पहा ते काय म्हणाले

















