Thursday, March 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : अंगावर पेट्रोल टाकून जाळून खून ; आरोपी पिता-पुत्रास जन्मठेपेची शिक्षा ;काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर :  सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे  यांनी आरोपी  सत्यनारायण मदनलाल करवा, वय ५७ वर्षे व आरोपी मनोज सत्यनारायण करवा, वय-३४ वर्षे रा. वर्धमान नगर, रुपाभवानी रोड, भवानी पेठ, सोलापूर यांना हनुमान घनशाम शर्मा याचा अंगावर पेट्रोल टाकून जाळून खून केल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे दोषी धरण्यात आले व जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की, दिनांक २१/०१/२०१७ रोजी सकाळी ०७:१५ वा. सुमारास यातील मयत हनूमान घनशाम शर्मा रा. महाराजगंज गौलीगुडा चमन, हैद्राबाद हे त्यांचे एमसीएक्स •व्यवहारातील पंधरा लाख रुपये मागण्याकरीता यातील आरोपी नामे सत्यनारायण करवा यांचे घरी गेले असता मयताने आरोपींना “माझे एमसीएक्स व्यवहारातील पंधरा लाख रुपये परत दया, मला दुस-यांना दयावयाचे आहेत असे म्हणाला त्यावेळी आरोपी सत्यनारायण करवा याने मी तुला ओळखत नाही, तु माझे घरात आलाच कसा, माझा काही संबंध नाही, तु इथून गेला नाहीस तर, माझा मुलगा पोलीस मेंबर आहे. त्याला सांगुन तुझ्यावर केस करायला लावीन” असे म्हणाला. त्यावर मयत हनूमान शर्मा याने आरोपीस “काही तरी पैसे दया नाहीतर मला मरावे लागेल असे म्हणून सोबत नेलेली बाटली बाहेर काढली व स्वःतच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करु लागला, त्याचवेळी मयत हनूमान शर्मा याने एका हातात लायटर दाखवला तेवढयात आरोपी व आरोपीचा मुलगा समोर आले आरोपी सत्यनारायण करवा मयत हनुमान शर्मा याला “तु काय मरतो आम्ही तुला दाखवतो कसे मरायचे ते” असे म्हणून दोन्ही आरोपींनी मयताचे हातातील पेट्रोलची बाटली घेवून मयताच्या अंगावर ओतली व मयाताशी झोंबाझोंबी करुन मयताचे हातातील लायटर घेवून मयतास पेटवून दिले. 

त्यानंतर मयत हनुमान शर्मा आरडाओरडा करीत असताना आरोपींनी मयतास विझवण्याचा प्रयत्न करु लागले असता त्यांना देखील भाजले. यातील मयत हनुमान शर्मा यांना दि. (२१/०१/२०१७ रोजी सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर येथे उपचारा करीता दाखल केले होते. यातील आरोपींनी मयताच्या अंगावर पेट्रोल ओतून मयतास पेटवून देवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु दिनांक २३/०२/२०१७ रोजी सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर येथून मयतास पुढील उपचाराकरीता सुर्या हॉस्पीटल, पुणे येथे दाखल केले होत. तेथून दिनांक ३०/०१/२०१७ रोजी नमूद मतास ओस्मानीया जनरल हॉस्पीटल, हैद्राबाद येथे उपचाराकरीता दाखल केले असता दिनांक ३१/०९/२०१७ रोजी उपचारा दरम्यान हनुमान शर्मा हे मयत झाले होते. यातील आरोपींनी मयताच्या अंगावर पेट्रोल ओतून हनुमान शर्मा याचा खुन केला आहे 

तसेच यातील आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने मयताचा एच.पी. कंपनीचा लॅपटॉप व विंडोज कंपनीचा मोबाईल यांची विल्हेवाट लावली होती. सदर प्रकरणी जोडभावी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता पोलीसांनी आरोपींच्या विरुध्द भा.दं.वि. नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी न्यायालयात ०७ साक्षीदार तपासले. सदर प्रकरणात वैदयकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा व मयताचे तीन मृत्युपूर्व जबाब या सर्व गोष्टींवरुन सदर आरोपींनी मिळून मयताच्या अंगावर पेट्रोल ओतून हनुमान शर्मा याचा खुन केला आहे. खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे व ते सिध्द केल्याचे युक्तीवादात सांगण्यात आले सदरचा जिल्हा सरकारी वकील प्रदिप्  सिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन आजरोजी यातील आरोपी सत्यनारायण मदनलाल करवा व मनोज सत्यनारायण करवा यांना खुनाचे अपराधाखाली दोषी धरण्यात आले.


या प्रकरणात न्यायालयात आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी होवून सदर आरोपींना खुनाच्या अपराधाखाली जन्मठेपेची सुनावली आहे. या कामी जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे  यांनी ग्राहय धरून खून केल्याप्रकरणी आरोपी क्रं. १) सत्यनारायण मदनलाल करवा व आरोपी क्रं. २) मनोज सत्यनारायण करवा भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रक्कम रु.२०००/- दंडाची शिक्षा सुनावली व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. 

तसेच मयताच्या प्रत्येक वारसदारास नुकसानभरपाई म्हणून आरोपींकडून प्रत्येकी रु. १,००,०००/- देण्याचा आदेश पारीत झाला आहे. सदर मयतास त्याची पनि रुपा हनुमान शर्मा तसेच मुलगा अभिषेक व मुलगी सुष्मीता असे तीन कायदेशीर वारस असल्याने एकुण तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई आरोपींनी सदर मयताचे वारसास दयावी लागणार आहे. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले. तर आरोपी क्रं. 1 व २ च्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक बी. एच पाटील यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून महिला पो. ना.  अनुराधा गुत्तीकोंडा बक्कल नं. ९३३ व रफिक तांबोळी बक्कल नं. १७९४ यांनी काम पाहिले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : पोलिसांनी आमच्यासोबत गद्दारी केली ; असे काय घडले सोलापूरात

Next Post

सोलापूर : सभासदांबरोबर कुटुंबाची काळजी घेणाऱ्या पतसंस्थेत सुद्धा आम्ही नंबर वनच

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : सभासदांबरोबर कुटुंबाची काळजी घेणाऱ्या पतसंस्थेत सुद्धा आम्ही नंबर वनच

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971308
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group