भारतीय जनता पार्टीचे वादग्रस्त आमदार धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे बुधवारी सोलापूर दौर्यावर होते सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये त्यांचा दौरा होता बहुजन समाज धनगर समाज भावसार समाज गोंधळी समाज यांच्यात घोंगडी बैठक पडळकर यांनी आयोजित केली होती सोलापुरात सकाळी 11 वाजता त्यांची पत्रकार झाली या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच टार्गेट केले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हे देशाचे पंतप्रधान होतील का या प्रश्नावर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ” रातगेली हिशोबात पोरग नाही नशिबात अशी मिस्कील कोपरखळी मारली . शरद पवार यांच्यावर केलेली खालच्या दर्जाची टीका यावर सोशल मीडियातून गोपीचंद पडळकर चांगलेच लक्ष झाले आहेत याच पार्श्वभूमीवर शहरातील वस्ती परिसरात गोपीचंद पडळकर यांच्या एम एच 10 झेड ए 007 या गाडीवर दगडफेक झाली या दगडफेकीमुळे गाडीच्या काचा फुटल्या आहेत घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस स्टेशन चा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची सोलापुरात वार्यासारखी माहिती पसरली.


















