महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी नवीन सुधारित आदेश काढला
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या आहेत, यामध्ये सर्वकाही नियमितपणे सुरू राहणार आहे मात्र विवाह समारंभासाठी पन्नासची अट रद्द करून आता शंभर लोकांना परवानगी दिली आहे. शहरात मात्र जमावबंदी लागू असणार आहे, त्याचबरोबर राज्य शासनाने जे टप्पे घालून दिले आहेत त्या पाचव्या टप्प्यांमध्ये जो शहर समाविष्ट आहे त्यातून सोलापुरात येणाऱ्यांसाठी ई पास बंधनकारक करण्यात आला आहे. शासकीय कार्यालयातील उपस्थिती शंभर टक्के करण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी सुद्धा गर्दीचे निर्बंध हटवण्यात आले आहेत अंत्यसंस्काराला मर्यादा घालून दिली गेली नाही. शहरातील व्यावसायिक दुकानदार उद्योजक यांना rt-pcr रॅपिड टेस्ट याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ब्युटी पार्लर, सलून, स्पा,जिम हे नियमितपणे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.