सिविल हॉस्पिटल मध्ये विठ्ठलसिंग शितल हे यांनी सुमारे 28 वर्ष कक्ष सेवक म्हणून सेवा केली मात्र नोकरी दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या जागेवर अनुकंपा खाली त्यांचे चिरंजीव दिनेशसिंग शितल यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता अनुकंपाची ऑर्डर होऊनसुद्धा त्यांना नोकरीवर घेतले गेले नाही त्यांनी सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉक्टर राजाराम पवार व दुसरे सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉक्टर सुनील घाटे यांच्याविरोधात तक्रार केली होती शेवटी हा विषय राज्यपाल यांच्या पर्यंत गेला होता त्यांनी या दोन्ही माजी अधिष्ठातांची विभागीय चौकशी लावली आहे तसे पत्र दिनेश सिंग शितल यांना प्राप्त झाले आहे.
डॉ. राजाराम मानप्पा पोवार, सेवानिवृत्त अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर हे अधिष्ठाता या नात्याने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर या संस्थेत दिनांक १६.१०.२०१४ पासून ते दिनांक ०९.०६.२०१७ पर्यंत कार्यरत असताना दिनेशसिंग विठ्ठलसिंग शितल राहणार ८११, उत्तर सदर बझार, कामाठीपुरा, सोलापूर ४१३००३ यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार सादर केलेल्या दिनांक २४.११.२०१६ च्या अर्जाच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी श्री. छ. शि.म.स. रु. सोलापूर यांनी माहिती न पुरविल्याने अर्जदार यांनी २८.१२.२०१६ रोजी प्रथम अपिलीय माहिती अधिकारी तथा अधिष्ठाता यांच्याकडे अपिल अर्ज सादर केला होता. सदर अपिल अर्जावर माहिती अधिकार अधिनिमय २००५ च्या कलम १९ मधील तरतूदीनुसार अपिलीय प्राधिकारी म्हणून डॉ. पोवार ३० दिवसाच्या मुदतीत अर्ज निकाली काढणे आवश्यक होते परंतू तशी कार्यवाही न करता माहितीच्या अधिकारीतील तरतुदीचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्याबाबत मा. राज्य माहिती आयोग, पुणे यांनी दिनांक ११.०२.२०१९ रोजी आदेश पारित केला आहे.
डॉ. राजाराम मानप्पा पोवार यांची ही कृती माहिती अधिकार अधिनियम २००५ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९८९ मधील नियम ३ चा भंग करणारी आहे. म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्त) वेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ च्या पोटनियम (२) (बी) (एक) द्वारे प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन शासन याद्वारे उक्त डॉ. राजाराम मानप्पा पोवार, सेवानिवृत्त अधिष्ठाता यांच्या विरुध्द विभागीय कार्यवाही करण्यास मंजुरी देत आहे.
डॉ. सुनिल विनायक घाटे, सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर हे अधिष्ठाता या नात्याने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर या संस्थेत दिनांक ०९.०६.२०१७ पासून ते दिनांक २८.०२.२०१९ पर्यंत कार्यरत असताना दिनेशसिंग विठ्ठलसिंग शितल राहणार ८११, उत्तर सदर बझार, कामाठीपुरा, सोलापूर ४१३००३ यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार सादर केलेल्या दिनांक २४.११.२०१६ च्या अर्जाच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी श्री. छ. शि. म. स. रु. सोलापूर यांनी माहिती न पुरविल्याने अर्जदार यांनी २८.१२.२०१६ रोजी प्रथम अपिलीय माहिती अधिकारी तथा अधिष्ठाता यांच्याकडे अपिल अर्ज सादर केला होता.
सदर अपिल अर्जावर माहिती अधिकार अधिनिमय २००५ च्या कलम १९ मधील तरतूदीनुसार अपिलीय प्राधिकारी म्हणून डॉ. पोवार ३० दिवसाच्या मुदतीत अर्ज निकाली काढणे आवश्यक होते परंतू तशी कार्यवाही न करता माहितीच्या अधिकारीतील तरतुदीचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्याबाबत मा. राज्य माहिती आयोग, पुणे यांनी दिनांक ११.०२.२०१९ रोजी आदेश पारीत केला आहे.
डॉ. सुनिल विनायक घाटे यांची ही कृती माहिती अधिकार अधिनियम २००५ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९८९ मधील नियम ३ चा भंग करणारी आहे. म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती चेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ च्या पोटनियम (२) (बी) (एक) द्वारे प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन शासन याद्वारे उक्त डॉ. सुनिल विनायक घाटे, सेवानिवृत्त अधिष्ठाता यांच्या विरुध्द विभागीय कार्यवाही करण्यास मंजूरी देत आहे.




















