पंढरपूर तालुक्यातील देगाव इथल्या गट नंबर 341/1, 341/2 अ, 341/2 ब या सातबारा उताऱ्यावरील सर्कल, तलाठी, कोतवाल यांनी बेकायदेशीर नोंदी चुकीच्या पद्धतीने घेतल्याने सातबारा उतारा दुरुस्त करून मिळावा यासाठी कुबेर चिमाजी घाडगे हे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून बसले दोन वाजेपर्यंत नोंदी न केल्यास बाटली मधील विष पिऊन उडी मारेन असा इशारा त्यांनी दिला आहे


















