सोलापूर :-सोमवारपासून शहरातील विडी कारखाने सुरू करण्यासह कोरोना टेस्ट त्याच कारखान्यात करण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत झाला.
सोलापूर शहरातील लॉक डाऊन शिथील झाल्यानंतर विडी कारखान्या तील कामगारांची कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती, त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात शनिवारी तुफान गर्दी झाली, त्याचा विचार करून शनिवारी दुपारी आमदार प्रणिती शिंदे, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, सोलापूर विडी उद्योग संघाचे सेक्रेटरी सुनील क्षत्रिय, बाळासाहेब जगदाळे, गोपाळ ब्रह्मभट, भूषण तिवाडी, पुरुषोत्तम दास, जिग्नेश पटेल, अल्पेश पटेल, लियाकत अत्तार, नरसय्या गडम, दीपक बंडेवार, तिरुपती परकीपंडला, यांच्या उपस्थितीत संभाजी विडी कारखान्यात बैठक पार पडली या बैठकीत येत्या सोमवारपासून टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व विडी कारखाने हे सकाळी 7 ते 10 दरम्यान सुरू करण्याचा निर्णय झाला, बिडी कामगार महिलांना त्याच ठिकाणी विडी बनवण्याचे साहित्य देण्यात येणार आहे तसेच कारखान्यातील कामगारांचे कोरूना टेस्ट ही सुद्धा त्याच कारखान्यांमध्ये सकाळी सात ते दहा च्या दरम्यान करण्यात येणार आहे, या प्रकरणी आमदार शिंदे उपायुक्त पांडे, सुनील क्षत्रिय यांनी अधिक माहिती दिली.

















