सोलापूर महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे पंढरपूर प्रांताधिकारी म्हणून पदस्थापना मिळाली आहे त्यांच्या जागेवर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी पदी चारुशिला देशमुख मोहिते या जिल्हा पुरवठा अधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या बदली नंतर रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी पद बऱ्याच दिवस रिक्त होते.
विठ्ठल उदमले हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. ते 2015 च्या राज्य सेवेतून त्यांची निवड झाली आहे. चारुशीला संतोष मोहिते- देशमुख या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बांबोड गावच्या आहेत. 2015 सालच्या राज्य सेवा बॅचच्या उपजिल्हाधिकारी आहेत.
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पदी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अद्याप ही अन्न धान्य वितरण अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली नाही.



















