मुंबई : राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.
रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. राज्य सरकारचे नवे निर्णय नेमके काय-काय? उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी. नाईट कर्फ्यू घोषित. राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय.
दिवसा ५ पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार. ५०% नाट्यगृह, सीनेमागृह राज्यातील हाँटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५० % क्षमतेने सुरू रहणार. बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक.
नव्या नियमावलीनुसार राज्यात काय सुरु-काय बंद?
1) राज्यातील शाळा, कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या कोचिंग क्लासेससाठी सूट देण्यात आली आहे. इतर सर्व कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील. हे क्लासेस ऑनलाईन सुरु असतील.
2) सरकारी कार्यालयांसाठी 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे. 3) राज्यात दिवसा जमावबंदी असेल तर रात्री संचारबंदी असेल. पण अत्यावश्यक सेवांसाठी मुभा देण्यात आली आहे. 4) मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

















