मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रविवारी रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला.
राज्यातील कोरोना चा संसर्ग पाहता 15 जून पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या जनतेच्या संवादावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं होतं. 1 ते 15 जून दरम्यान लॉकडाऊन असणार नाही मात्र काही ठिकाणी निर्बंध कडक करणार आहे असे त्यांनी सांगितले दहावी परीक्षेचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र बारावीच्या परीक्षेसाठी केंद्र स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून देश पातळीवर निर्णय निर्णय घ्यावा अशी मागणी करणार आहे ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता माझे गाव कोरोना मुक्त गाव हे अभियान यापुढे राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले पावसाळा तोंडावर असल्याने शेतीची कामे पेरणी याचा विचार करून शेती संबंधित सर्व दुकाने सुरू राहतील मात्र गर्दी होता कामा नये अशा सूचना त्यांनी केल्या.



















